Wednesday, July 15, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

दिशाभूल -भोरला जिल्हा नियोजनातून आलेल्या विकास कामांबाबत जनतेची दिशाभूल, कामे कोणी मंजूर करून आणली आणि कोण श्रेय घेतय ? पत्रकार परिषदेत रणजीत शिवतरे यांचा आमदार थोपटेंवर हल्लाबोल.

लवकरच विरोधाकांना त्यांची जागा दाखवु , परिवर्तन अटळ आहे घोडेमैदान जवळ आहे, मंगळवारी ७ तारखेला महायुती कडून भोरच्या जिल्हा नियोजनातून मंजूर विकास कामांचे होणार भूमिपूजन

by कुंदन झांजले
October 4, 2024

भोर : जिल्हा वार्षिक योजना(जिल्हा नियोजन)सन २०२३-२४ महाराष्ट्र नगरोत्थान योजनेअंतर्गत विविध विकास कामे पुणे जिल्हा पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन बैठकीत रणजित शिवतरे यांच्या शिफारस, संदर्भिय पत्रान्वये मंजूर झाली असून या विकास कामांचे श्रेय घेण्यासाठी विद्यमान आमदार व काँग्रेसचे पदाधिकारी यांनी जाणुन-बुजूण जनतेची दिशाभूल करण्यासाठी आज शुक्रवार (दि.४)ला अचानक या मंजूर होऊन आलेल्या विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम घेऊन कामांचे भूमिपूजन केले. काँग्रेसचे पदाधिकारी व विद्यमान आमदारांनी सदर कामांच्या मंजुरी आपण आणली असे सांगत जनतेची दिशाभूल केली आहे जिल्हा नियोजन समिती कामे देत नाही म्हणून विद्यमान आमदार महाविकास आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करून अजित पवारांबदद्ल नाराजी व्यक्त केली आणि पुन्हा जिल्हा नियोजन समितीच्या कामांचे श्रेय घेत आम्ही कामे वरून मंजूर करून आणली अशी जनतेची दिशाभूल करण्याचे काम आमदार व कांग्रेसने केले आहे. भाटघर व वीर धरण प्रकल्पग्रस्त नागरी सुविधा विकासकामांच्या बाबतीतही यांनी असेच केले असे प्रतिपादन भोर येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात जि.प.माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी केले.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

शिवतरे पुढे म्हणाले ४ कोटी २५ लाखांच्या  विविध विकासकामांची  प्रशासकीय मंजूरी झाली असून या विकास कामांमध्ये भोर नगरपरिषद हद्दीतील भोई आळी  येथे दिलीप रोमण घरासमोरील काँक्रिटीकरण रस्ता व गटार बांधणे १५ लक्ष , संजय नगर येथील डॉक्टर तारू दिघे घर पवार सर ते कुणाल शिंदे यांच्या घरापर्यंतचा रस्ता करणे३५ लाख,   संजय नगर येथील खंडोबा मंदिर ते भोरदरा धनगर वस्ती रस्ता करणे ५० लाख , शहरातील वेताळ पेठ येथील जुबली तलाव सुशोभीकरण करणे २५ लाख ,भोर शहरातील विविध भागात स्ट्रीट लाईट व्यवस्था करणे १० लाख , शहरातील नगरपालिका शाळेच्या डिजिटल रूम बनवणे १५ लाख,  वाघजाई मंदिर येथे भुयारी गटर कॉंक्रिटीकरण करणे २५ लाख,  वेताळ पेठेतील जुन्या जलशेजारील नगरपालिका हद्दीत अभ्यासिका व सभामंडप बांधणे ५० लाख, प्रभाग क्रमांक एक मधील मुरलीधर तारू घर ते श्री चव्हाण घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १४ लाख ३५ हजार रुपये प्रभाग क्रमांक तीन मधील मशालीचा माळ नीरा घाट शेजारी रस्ता कॉँक्रेटींग करणे व पेव्हींग ब्लॉक बसवणे व रेलिंग बसवणे ७ लाख ८४ हजार,शंकर सावंत घर ते पिराचा मळा ड्रेनेज लाईन करणे ३३  लाख ७८ हजार ,वाघजाई नगर विभुते करते कोठावळे घर नाला ड्रेनेज लाईन करणे ९ लाख १८ हजार , प्रभाग क्रमांक ३ श्रमीक हॉलच्या  पाठीमागील बाजूस ड्रेनेज लाईन करणे २ लाख ४० हजार, आतार घर ते रियाज शेख रस्ता काँक्रीटमेंट करणे १६ लाख ९५ हजार ,काळा गणपती चौक ते राजवाडा कमान रस्ता रुंदीकरण करणे ३५ लाख ६७ हजार , सरकारी वहाळ ते महालक्ष्मी सोसायटी ते भोरेश्वर मंदिर पिछाडी दोन्ही बाजूस गटर काम करणे ३७ लाख ७५ हजार , प्रभाग क्र. ४ मधील भिलारे वाडा ते एसटी स्टँड पर्यंत पेव्हींग ब्लॉक बसविणे ३२ लाख १९ हजार तसेच प्रभाग क्र.४ मधील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत पेव्हींग ब्लॉक बसवणे ३२ लाख १९ हजार अशा भोर शहरातील प्रस्तावित विकास कामांना पुणे जिल्हा पालकमंत्री तथा उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. विरोधकांनी कितीही विकास कामांचे श्रेय लाटले तरी ,येणाऱ्या आगामी निवडणुकीत विरोधकांना त्यांची जागा दाखवू यावेळेस परिवर्तन अटळ आहे घोडे मैदान जवळ आहे. असे पत्रकार परिषदेत रणजीत शिवतरे यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार पक्ष) शहराध्यक्ष केदार देशपांडे, ज्येष्ठ नेते यशवंत डाळ, सोमनाथ ढवळे, कुणाल धुमाळ,शिवसेना (शिंदे पक्षाचे) नितीन सोनावले, भाजपाचे सरचिटणीस कपिल दुसंगे, अतुल काकडे असे महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
जेजुरीः मा. नगरसेवक व मा. विश्वस्तांनी केलेले आरोप बिनबुडाचे; शहर भाजपकडून निषेध, ‘त्या’ आरोपांचे त्यांनी पुरावे द्यावेतः शहर भाजप

जेजुरीः मा. नगरसेवक व मा. विश्वस्तांनी केलेले आरोप बिनबुडाचे; शहर भाजपकडून निषेध, 'त्या' आरोपांचे त्यांनी पुरावे द्यावेतः शहर भाजप

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group