नसरापूर (ता. भोर): नसरापूर गावातील घरातील आणि व्यवसायांचा कचरा योग्यरित्या विल्हेवाट न लावल्याने गावकऱ्यांमध्ये त्रास निर्माण झाला आहे. गावातील ओढ्यात आणि इतर ठिकाणी उघड्यावर टाकला जाणारा कचरा नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.
भोर तालुक्यातील हायवे लगत असलेल्या नसरापूर येथील नागरिक कचऱ्याच्या समस्येने हैराण झाले असून काही काळा पूर्वी स्वच्छ सुंदर असलेले नसरापूर आता कचऱ्याचे आगार बनले आहे. आता दुर्गांधीवरूनच नसरापूर गावाची ओळख तयार झालेली पाहायला मिळत आहे. सर्वात मोठी ग्रामपंचायत असून देखील फक्त स्वतःचाच विचार केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. नसरापूर ग्रामपंचायत कचरा व्यवस्थापन करण्यात निष्फळ ठरली असून आश्वासनांचा फक्त पाऊस पडला जात आहे. आणि सत्यात मात्र काहीच उतरले जात नाही .
या कचऱ्यामुळे ओढ्याचे पात्र काचाऱ्यानी भरले आहे. गावात चेलाडी ब्रिज शेजारी, साहि्याद्री सिटी, लेंडी ओढा मेन चौक,साईराज चायनीज समोर,बागमार सोण्याच्या दुकाना समोर,मेन आळी,महावितरण समोर सिद्धिविनायक हॉस्पिटल , शिव गंगा नदी पात्र अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या आणि पोत्यांमध्ये बांधून कचरा टाकल्याने तो कुजून, सडून ओढ्यातच साचून राहतो. यामुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो.
नसरापूर गावठाणाचा विस्तार मर्यादित असल्याने कचऱ्याची समस्या मात्र आता गंभीर बनत चालली आहे.गावातील कचरा ग्रामपंचायतीकडून उचलला जात नसल्यामुळे नसरापूरसह परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे आणि आरोग्याच्या समस्या वाढत आहेत.
ग्रामपंचायतीने घंटागाडी सुरू करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या घटांतागडीचा उपयोग होत नाही आणि हे पुरेसे नसल्याचे नागरिकांचे मत आहे. परिसरातील कचरा तातडीने हटवून करण्याची आणि गावातील कचरा निर्मूलनासाठी ठोस उपाययोजना करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.
कचरा प्रश्नाला सर्वस्वी ग्रामपंचायत जबाबदार असून ग्रामपंचायतीने आज पर्यंत येथील कचरा उचलण्याचे सोय केलेली नाही.त्याचप्रमाणे बाहेरील व्यवसायिक या ठिकाणी कचरा टाकत असून याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहे. ग्रामपंचायतीने यावर योग्याती निर्णय घ्यावा अन्यथा सर्व कचरा उचलून ग्रामपंचायत समोर टाकण्यात येईल. – प्रवीण ठोंबरे, नसरापूर नागरिक
चेलाडी ब्रिज शेजारी, साहि्याद्री सिटी, लेंडी ओढा मेन चौक,साईराज चायनीज समोर,बागमार सोण्याच्या दुकाना समोर,मेन आळी,महावितरण समोर सिद्धिविनायक हॉस्पिटल , शिव गंगा नदी पात्र अश्या अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून ग्रामपंचायत पूर्णपणे याकडे दुर्लक्ष करीत आहे आणि फक्त आश्वासन देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. – रवींद्र हरगुडकर
कचरा टाकू नये, असे सांगूनही कचरा टाकला जात आहे.गावातील कचऱ्याचे निर्मूलन व्हावे याकरिता अनेक वेळा मोकळ्या जागेसाठी प्रयल करण्यात आलेले आहेत. त्याकरिता अडचणी येत असल्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आहे. मात्र, हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी युद्धपातळीवर पंचायतीचे नियोजन सुरू आहे तसेच पुढील महिन्याच्या २० तारखेपासून कचरा हा किकवी या ठिकाणी संस्थे मार्फत टाकण्यात येणार आहे परंतु त्या आगोदर सोमवार पासून नसरापूर येथील कचरा हा गोळा केला जाणार असून त्याची योग्य ठिकाणी विल्लेवाट लावली जाणार आहे – विजयकुमार कुळकर्णी, ग्रामसेवक नसरापूर
क्रमशः