भोर : तालुक्याच्या पश्चिमेकडील वेळवंड खोऱ्यात दुर्गम भागात काही दिवसांपासून वीजेचा लपंडाव सुरू होता .आठ ते दहा दिवस राजघर, वेळवंड, पांगारी, जयतपाड, नानावळे, गायमाळ, नांदघूर, रेणूसेवाडी, विचारेवाडी,जळकेवाडी,हुंबेवस्ती अशा अनेक गावात वीज गायब झाली होती .
रोहित्रात (डिपीत) मोठा बिघाड झाल्याने विद्युत रोहित्र नादुरुस्त झाले होते. परिणामी लाईट नसल्याने या भागातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते.अशाचत सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे भोर तालुका उपाध्यक्ष समीर घोडेकर व भाजपा युवा ऑरिअरचे अध्यक्ष रोहन भोसले यांनी स्व:ता या गावांतून जाऊन नागरिकांच्या समस्या ऐकल्या खास करून महिलांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे असे त्यांना सांगण्यात आले. यावेळी घोडेकर यांनी दूरध्वनीवरून महावितरणच्या अधिका-यांशी संपर्क साधुन रोहित्र लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी केली .
महावितरणच्या अधिका-यांनीही दिवस- रात्र, मोठ्या प्रमाणात पाऊस असताना देखील संबंधित या रोहित्राची दुरूस्ती करून सदर विद्युत रोहित्र बसवून व वीज प्रवाह सुरळीत चालू केला. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अरविंद अंभोरे व या भागातील महावितरणचे अधिकारी एस एस साबळे, कर्मचारी, वायरमन यांनी सदर रोहित्र बसविणे कामी दिवसरात्र मेहनत घेतली.
सध्या या भागातील गावांचा वीज पुरवठा सुरळीत झाला असुन गावकऱ्यांकडून महावितरणचे अधिकारी व घोडेकर ,भोसले यांचे आभार मानण्यात येत आहे.