भोर: राजा रघुनाथराव विद्यालयामधील सन २०१५-१६ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून एकत्र येत भोर तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या म्हसर खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ब्लॅक बोर्ड, साउंड सिस्टीम व इतर शालेय वस्तूंचे वाटप केले. हे माजी विद्यार्थी दरवर्षी दुर्गम भागातील शाळांना मदत करीत असतात. या देखील वर्षी म्हसर येथे शालेय उपयोगी साहित्याचे वाटप त्यांनी केले आहे.
यावेळी संदेश समीर, अनिकेत जगदाळे, पंकज देशमाने, अथर्व धोंगडे, आदित्य माने, प्रकाश ओव्हाळ, अनिकेत पिलाने, ऋषिकेश जाधव, साहिल कंक, शुभम गाढवे, उत्कर्ष भागवत, आदित्य शिवतरे, स्वप्निल काळाने, मयूर शिंदे, किरण कुंभार, मयूर चव्हाण, योगेश धोत्रे, अमीर शेख, सुरज लोणकर, किरण खाटपे, अनिल कोकरे, करण आवताडे, शिक्षक मंगल कदम, नेताजी कंक, सरपंच संतोष गोळे,उपसरपंच, संचालक सुरेश राजीवडे, सुनिल कंक, लक्ष्मण कंक सह ग्रामस्थ तसेच विद्यार्थी उपस्थित होते.