Sunday, July 19, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित; रविवारी पक्षप्रवेशाची शक्यता

by SBPRNL
April 17, 2025
भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित; रविवारी पक्षप्रवेशाची शक्यता

भोर : पुणे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत. भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असून येत्या रविवारी ते भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश होणार आहे.

संग्राम थोपटे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून ते तीन वेळा आमदार राहिले आहेत. त्यांच्या वडिलांनी – अनंतराव थोपटे यांनी – भोर मतदारसंघातून तब्बल सहा वेळा आमदारकी भूषवली होती.

You might also like

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

नुकत्याच निवडणुकीतील पराभव आणि बदलते समीकरण

अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी केला होता. त्यानंतर संग्राम थोपटे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेस राजीनामा अद्याप नाही

संग्राम थोपटे यांनी अधिकृतरीत्या काँग्रेसला राजीनामा दिलेला नाही. मात्र, ते कार्यकर्त्यांशी चर्चा करत असून रविवारी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.

राजगड साखर कारखान्याचा मुद्दा केंद्रस्थानी

थोपटे अध्यक्ष असलेला राजगड सहकारी साखर कारखाना सध्या आर्थिक अडचणीत आहे. राज्य सरकारने कारखान्यासाठी 80 कोटी रुपयांचे मार्जिन मनी मंजूर केले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिल्यामुळे आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यामुळे, अजित पवारांच्या विरोधामुळे ही मदत मागे घेण्यात आली. त्यामुळे आता कारखान्याला मदत मिळवण्यासाठी थोपटे भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची जोरदार चर्चा आहे.

थोपटे आणि पवार यांच्यातील जुना वाद

भोरच्या थोपटे कुटुंबीयांचा आणि बारामतीच्या पवार कुटुंबाचा राजकीय वाद अनेक दशकांपासून सुरू होता. अनंतराव थोपटे यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता असताना शरद पवारांनी त्यांना रोखल्याचा दावा त्याकाळी केला जात होता. यानंतर अनंतराव थोपटे हे राजकारणात मागे पडले होते.

लोकसभा निवडणुकीत मैत्रीचा हात

अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभं केल्यावर, पवार कुटुंबीयांनी थोपटे कुटुंबीयांशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली आणि 40 वर्षांपासून चालत आलेला वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परिणामी सुप्रिया सुळे यांना भोरमध्ये मोठं मताधिक्य मिळालं.

मात्र आता पुन्हा एकदा थोपटे आणि पवार कुटुंबीयांमध्ये राजकीय अंतर वाढताना दिसत आहे. संग्राम थोपटे यांचा भाजप प्रवेश भविष्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम करू शकतो.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी
ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी
वेल्हे

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 
खंडाळा

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा
भोर

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
जल जीवन मिशनचा करंदी खेबाला दिलासा; कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यामुळे टँकरला अखेर पूर्णविराम
भोर

जल जीवन मिशनचा करंदी खेबाला दिलासा; कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यामुळे टँकरला अखेर पूर्णविराम

July 2, 2026
शिंदेवाडी बोगद्यानजीक ११ बाईकस्वारांकडून व्यावसायिकाला बेदम मारहाण; वाहनाची तोडफोड
क्राईम

शिंदेवाडी बोगद्यानजीक ११ बाईकस्वारांकडून व्यावसायिकाला बेदम मारहाण; वाहनाची तोडफोड

July 1, 2026
Next Post

Bhor Breaking - भोर तालुक्यातील १५६ ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group