भोर : भोर, राजगड, मुळशी तालुका कॉग्रेस पक्षाच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवासाठी सिनेअभिनेते व सिनेतारकांनी हजेरी लावत गाण्याच्या तालावर ठेका धरला. या वेळी मोठ्या संख्येने तरुण सहभागी होत. उपस्थितांनी पावसात भिजत गाण्याच्या तालावर नाचत दहीहंडीचा आनंद लुटला. या दहीहंडी फोडण्याचा मान भोईराज गोविंदा पथकांने साहसी थर रचत पटकावित ५१ हजारांचे रोख बक्षीस जिंकले.
अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या मैदानावर भोर, राजगड, मुळशी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार संग्राम थोपटे, राजगड ज्ञानपीठाच्या मानद सचिव स्वरुपा थोपटे, युवा नेते पृथ्वीराज थोपटे यांच्यासह सिनेअभिनेता संतोष जुवेकर, सिनेअभिनेत्री मृण्मयी देशपांडे, शिवाली परब या प्रमुख सेलिब्रेटींसह शैलेश सोनवणे, विठ्ठल आवाळे, अतुल किंद्रे, अभिषेक येलगुडे, महेश टापरे विजय शिरवले, निर्मला आवारे, सचिन हर्णसकर, समीर सागळे, सुमंत शेटे, तौसिफ आतार, विश्वजित चव्हाण, नितीन दामगुडे, बजरंग शिंदे, नरेश चव्हाण, बबलू बोडके, जगदीश किरवे, गणेश पवार, परवेज शेख, अमित सागळे, संतोष केळकर उपस्थित होते
भोईराज गोविंदा पथक भोर, भोईराज गोविंदा पथक शिरवळ, रविवार पेठ गोविंदा पथक वाई ही गोविंदा पथक यांनी उपस्थित राहून दहीहंडी फोडण्यासाठी सहभाग घेतला. तर सिनेअभिनेता संतोष जुवेकर, सिनेअभिनेत्री मृण्मयी देशपांडे व शिवाली परब या प्रमुख सेलिब्रेटींनी गाण्याच्या तालावर ठेका धरला आणि बालगोपालांसह महिलावर्ग, युवावर्ग यांनी पावसात भिजत या नाचत दहीहंडीचा आनंद घेतल्याचे अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त अभिषेक येलगुडे यांनी सांगितले.