Sunday, June 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Police Patil: भोर तालुक्यातील गावपुढारी गावात नामधारी, वास्तव्यास मात्र बाहेरगावी

अनेक गावातील सरपंच ,उपसरपंच, पोलीस पाटील सह्यांपुरते गावाला

by कुंदन झांजले
August 29, 2024

भोर  : सध्या शासन सर्वत्र गावा गावातुन विविध लोकोपयोगी योजना राबवित आहे.या योजनांचा लाभ सर्वसामान्याना , गरजूंना कसा मिळेल याकरिता शासन विविध उपक्रम गावात घेत गावातील पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती मार्गदर्शन देऊन या योजनांची अंमलबजावणी गावात कशा पद्धतीने होईल,याचा फायदा लाभ गावातील गरजू नागरिकांना कसा होईल हे पहात आहे. यामध्ये सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक ,सदस्य असे महत्त्वाचे पदाधिकारी गावात नेमलेले आहेत परंतु हेच पदाधिकारी सध्या गावात नसल्याने येणाऱ्या योजना मात्र कागदावरच रहात असुन गरजूंना यांचा फायदा होत नसल्याचे चित्र आहे

भोर तालुक्यातील ब-याच गावातील विशेषतः दुर्गम भागातील वेळवंड, भुतोंडे ,हिरडस मावळ, वीसगाव -चाळीस खो-यातील सरपंच , उपसरपंच व पोलीस पाटील हे गावपुढारी सह्या करण्यापुरते गावात येत असुन वास्तव्यास मात्र बाहेरगावी, परगावी असुन नुसते मानधनाचे पदाधिकारी असे चित्र आहे. सध्या पोलीस पाटलांना मानधनात दुप्पट वाढ होऊन पंधरा हजार मानधन व सरपंचांना तीन हजार मानधन आहे. बाहेरगावी वास्तव्यास असणाऱ्या पदाधिका-यांबाबत प्रशासन मात्र याबाबत कोणतेही ठोस पावलं उचलत नसल्याचे दिसत आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी, गावातील अनुचित घटना भांडण तंटे टाळण्यासाठी ,नैसर्गिक आपत्ती संकटापासून गावाला वाचवण्यासाठी, साथीच्या आजारापासून गावात होणारा संसर्ग रोखण्यासाठी , गावच्या संरक्षणासाठी प्रशासकीय पोलीस पाटील हे पद भरती प्रक्रियेने गावात नेमत आहे. उपविभागीय प्रांताधिकारी व पोलीस स्टेशन यांच्या मार्फत यांचे कामकाज चालते परंतु पोलीस पाटील या पदावर भरती झालेले पाटील मात्र पोलिस स्टेशनच्या रजिस्टरला सह्या करण्यापुरते गावात येत असुन बाहेरगावी फिरण्यात दंग आहेत. कित्येक गावात मागील काही दिवसांत रात्री अपरात्री नैसर्गिक, भौगोलिक, सामाजिक, चोरीच्या, अपघाताच्या, चांगल्या -वाईट अशा घटना घडल्या. परंतु पाटील गावात नसल्याने याची माहिती प्रथम पोलीस स्टेशनला गावकऱ्यांकडून मिळाली व नंतर पाटील गावात येऊन माहितीचा शोध घेऊ लागले अशी परिस्थिती झाली.

सरपंच, उपसरपंच यांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे.सरपंच निवडताना गावात असणारी मोठी भावकी, सत्ता ,पैसा, गट, राजकीय पक्षाचा हस्तक्षेप अशा अनेक परिस्थितीतून कधी गावात न फिरकणारा, समाजात नसणारा बाहेरगावी वास्तव्यात असणारा माणूस निवडला जात आहे.नंतर मात्र पश्चाताप करत उगाच निवडून दिला असा सरपंच, उपसरपंच असे गावकरी बोलत आहेत. गावात जे खरोखर प्रामाणिकपणे पदाधिकारी काम करत आहेत त्यांना मात्र बाहेरगावी राहणाऱ्या या पदाधिकाऱ्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत असे अनेकांकडून सांगण्यात आले आहे.

” भोर तालुका हा दुर्गम भागात वसलेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातुन गावागावातून पोलीस पाटील यांनी चोवीस तास जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असलेच पाहिजे. गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी गाव प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा पोलीस पाटील असून त्यांनी गावात हजर राहणे अत्यंत गरजेचे आहे”. डॉ.विकास खरात -उपविभागीय अधिकारी/ प्रांताधिकारी भोर

Tags: BhorPune
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

कौतुकास्पदः पुरंदरमधील विद्यार्थिंनीची पंजाब नॅशनल गतका क्रीडा स्पर्धेत सिल्व्हर मेडलवर मोहर

ताज्या बातम्या

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group