Thursday, June 4, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor News – रायरेश्वर गडावर उद्या रविवारी होणार स्वच्छता मोहीम ; खासदार निलेश लंके यांचा गड, किल्ले संवर्धन व स्वच्छता मोहीमेतील तिसरा गड

by कुंदन झांजले
May 24, 2025

खासदार नीलेश लंके शिव प्रतिष्ठानची उत्कृष्ट संकल्पना

भोर – छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यातील गड किल्ले कोटांचे संवर्धन व स्वच्छता मोहीमेअंतर्गत उद्या रविवार दि.२५ मे रोजी पुणे जिल्ह्यातील रायरेश्वर किल्ल्यावर स्वच्छता व संवर्धन मोहिम राबविण्यात येणार आहे. खासदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेच्या या मोहीमेतील रायरेश्वर किल्ला हा तिसरा गड, किल्ला असून त्यासाठी स्वयंसेवक शिवपाईक शनिवारी सायंकाळी किल्ल्याकडे प्रस्थान करणार आहेत. १० मार्च रोजी खासदार नीलेश लंके यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यातील गड किल्ले कोटांचे संवर्धन व स्वच्छता मोहिम हाती घेण्याची घोषणा करून मार्च महिन्यामध्येच १६ मार्च रोजी शिवजन्मभुमी शिवनेरीपासून या मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात आला होता. एप्रिल महिन्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृती जतन करणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील पेडगांव येथे धर्मवीर गडावर दुसरी स्वच्छता व संवर्धन मोहिम राबविण्यात आली. खासदार नीलेश लंके प्रतिष्ठानचे सभासद तसेच शिवप्रेमी असे हजारो मावळे या मोहिमांमध्ये सहभागी झाले होते. दोन यशस्वी मोहीमांनंतर आता जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली त्या पुणे जिल्ह्यातील भोर येथील रायरेश्वर गडावर स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेसाठीही हजारो शिवप्रेमी खासदार  नीलेश लंकेसह उपस्थित या रहाणार आहेत.तसेच या  प्रतिष्ठानच्या सभासदांनी या मोहीमेसाठी  ऑनलाईन नोंदणीदेखील केली आहे.

You might also like

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

खासदार निलेश लंके यांचा गडावर मुक्काम

या मोहिमेच्या निमित्ताने खासदार नीलेश लंके हे आज शनिवारी सायंकाळीच रायरेश्वर गडावर हजेरी लाऊन तिथेच मुक्काम करणार  आहेत. गडावरील सभामंडपात ते विश्रांती घेऊन रविवारी सकाळी सात वाजता सुरू होणाऱ्या स्वच्छता व संवर्धन मोहीमेत सहभागी होणार आहेत. गडावर मुक्काम करणारे खासदार नीलेश लंके हे पहिलेच लोकप्रतिनिधी ठरणार आहेत.

मोहीमेसाठी बसची व्यवस्था

या मोहीमेत सहभागी होणाऱ्या मावळयांसाठी अहिल्यानगर व पारनेर येथून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. अहिल्यानगर- सुपा- पारनेर- शिरूर- तळेगांव ढमढेरे – अष्टापूर – उरूळीकांचन – सासवड – नारायणपुर – कापुरहोळ – भोर – रायरेश्वर  गड या मार्गाने बसेस जाणार आहेत. शनिवारी सायंकाळी ६ वाजता नगर येथून तर सायंकाळी ७ वाजता पारनेर येथून बसेस प्रस्थान करतील व ती बस भोर येथे मुक्कामी जातील.

गडसंवर्धन मोहीमेसाठी आवश्यक साहित्य

मुक्कामासाठी आंथरूण, पांघरूण, हलके ब्लँकेट, मुक्कामाच्या कालावधीसाठी हवामानाच्या स्वरूपानुसार पुरेसे कपडे, आरामदायक पोषाख, रेनकोट, स्वतःची औषधे सोबत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भोजन, नाश्त्याची सोय

मुक्कामाच्या ठिकाणी शनिवारी रात्रीचे जेवण, रविवारी सकाळचा नाश्त्याची तसेच दुपारच्या जेवणाची नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोर वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर साष्टांग प्रणाम आंदोलन; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

August 13, 2025
ताज्या बातम्या

Bhor- रास्ता रोको आंदोलन !! भोरला रस्त्यांसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा एल्गार  ; भोर- कापूरव्होळ रस्त्यांची दयनीय अवस्था ; शाळेच्या विद्यार्थ्यांसह भोलावडे पंचक्रोशीतील नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन

August 5, 2025
Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?
क्राईम

Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?

August 2, 2025
Next Post

Bhor News - शिवरायांनी उभे केलेले गड किल्ले जतन व संवर्धन करून इतिहास जपण्याचे काम अविरतपणे करणार - खासदार निलेश लंके 

ताज्या बातम्या

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

May 30, 2026
न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

May 26, 2026
“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

May 26, 2026
राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबार; दोघे जखमी, जिल्ह्यात नाकाबंदी

राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबार; दोघे जखमी, जिल्ह्यात नाकाबंदी

May 25, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

RajgadNews.Live हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य स्थानिक मराठी न्यूज पोर्टल आहे. आमचे मुख्य उद्दिष्ट जगभरातील आमच्या वाचकांसाठी ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वपूर्ण माहिती अचूकपणे आणि थेट मराठीत पोहोचवणे हे आहे. राजकीय, सामाजिक, क्रीडा असो वा स्थानिक घडामोडी, महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील बातमी आम्ही तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवतो.

Follow Us

Copyright © 2026. Rajgad News.live

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. Rajgad News.live

WhatsApp us