Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor News – शिवरायांनी उभे केलेले गड किल्ले जतन व संवर्धन करून इतिहास जपण्याचे काम अविरतपणे करणार – खासदार निलेश लंके 

by कुंदन झांजले
May 26, 2025

गडकिल्ले संवर्धन व स्वच्छता मोहीमेतील लंके यांचा रायरेश्वर तिसरा गड

रायरेश्वर भोर – शिवरायांचे विचार घराघरात, मनामनात पोहोचले पाहिजे. हे विचार पुढे न्यायचे असतील तर शिवरायांनी उभे केलेले गड किल्ले व इतिहासाला उजाळा देऊन ते जपण्यासाठी आपण सर्वांनी काम करायला हवे असे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केले. ते रविवारी दि.२५ रोजी किल्ले रायरेश्वर (ता.भोर) येथील गड किल्ले संवर्धन व स्वच्छता मोहिम प्रसंगी शिवभक्तांसमोर बोलत होते.छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आपण समाजात वावरतो. शिवरायांचे नाव घेतल्याशिवाय आपला दिवसही जात नाही , त्या राजासाठी महिन्यातील एक तरी दिवस दिला पाहिजे तरच आपल्याला ‘जय शिवाजी जय भवानी’ म्हणण्याचा अधिकार असुन  छत्रपती शिवरायांचे विचार आपल्या सर्वांच्या मनात, समाजात रुजायला हवेत असे लंके यांनी सांगितले.यावेळी आपला मावळा संघटनेचा शुभारंभ खासदार लंके यांच्या उपस्थितीत करण्यात आला. खासदार लंके यांनी रायरेश्वर मंदीरात महादेवाचे दर्शन व शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपस्थित शिवभक्तांसमवेत स्वराज्याची शपथ घेत स्वच्छता मोहिमेस सुरवात करण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात स्वच्छता व वृक्षारोपण करून वीज व सौर उर्जाचे दिवे, शिवभक्तांना पिण्याच्या पाण्याचे रांजण, सुचनादर्शक फलक बसविण्यात आले. सभामंडपाच्या खांबांना रंग देण्यात आला. ग्रामस्थांना रेनकोट वाटप केले. पेविंग ब्लॉग, डस्टबीन आदी उपयुक्त वस्तू देऊन विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेची पाहणी खासदार लंके यांच्याकडून करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून गड किल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहीम करण्याचा निर्णय घेतला असून आतापर्यंत शिवनेरी व  धर्मवीर गडावर स्वच्छता व संवर्धन करण्यात आले आहे. २७  एप्रिल १६४५ रोजी छत्रपती शिवरायांनी आपल्या जिवलग सवंगड्याच्या साथीने याच रायरेश्वर गडावरील मंदिरात स्वराज्याची शपथ घेऊन ती सत्यात उतरवण्याचे काम केले. त्यामुळे आज पवित्र भूमी असलेला रायरेश्वर किल्ला निवडला असून  असल्याचे सांगून या मोहीमेच्या माध्यमातून ‘आपला मावळा’ या संघटनेची स्थापना करून कमिटी नेमण्यात आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी प्रत्येक गडावर जाऊन गड किल्ले व संवर्धन संकल्पना रावणार असल्याचे खासदार लंके यांनी सांगितले. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी रामेश्वर निमसे, कार्याध्यक्षपदी सुधीर लाकुडझोडे, उपाध्यक्षपदी दौलत गांगडे व योगिराज गाडे, सचिवपदी सिताराम काकडे, सहसचिवपदी अमोल झेंडे तर खजिनदारपदी अल्ताफ शेख यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
खासदार लंके हे शिवभक्तांसह शनिवारी दि.२४ रोजी रात्री गडाच्या पायथ्याशी असलेल्या टिटेघर वडतुंबी येथील विद्यालयात मुक्कामी होते. रविवारी सकाळी सर्व साहित्य घेऊन शेकडो शिवभक्तांसह गडावर पोहचले. यावेळी लंके यांनी स्वतः हातात झाडू घेऊन मंदीरात स्वच्छता केली व वृक्षारोपण केले. यावेळी वयोवृद्ध, तरुण, महिला व लहान मुले मुली उपस्थित होते. दरम्यान गडाच्या पायथ्याशी नाष्टा व भोजनाची व्यवस्था संघटनेकडून करण्यात आली होती.

ऐन अवकाळी पावसात रायरेश्वरावर गडाची चढाई
सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असतानाही लोखंडी शिडीवरुन रायरेश्वरावर खादार लंके सहित वयोवृद्ध, महिला, लहान मुलांसह तरुणांनी वृक्षांची रोपे, टिकाव फावडे, मोठाले रांजण, घमेली , डस्टबीन घेत लोखंडी फलकांसह अवजड वस्तू गडावर पोहोच केल्या. तसेच विज प्रवाह बंद करुन कार्यकर्त्यांकडून पावसात विजेच्या खांबावर चढून दिवे जोडण्याचे काम करण्यात आले.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

यावेळी आपला मावळा संघटनेचा शुभारंभ खासदार लंके यांच्या उपस्थितीत करण्यात आला. खासदार लंके यांनी रायरेश्वर मंदीरात महादेवाचे दर्शन व शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपस्थित शिवभक्तांसमवेत स्वराज्याची शपथ घेत स्वच्छता मोहिमेस सुरवात करण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात स्वच्छता व वृक्षारोपण करून वीज व सौर उर्जाचे दिवे, शिवभक्तांना पिण्याच्या पाण्याचे रांजण, सुचनादर्शक फलक बसविण्यात आले. सभामंडपाच्या खांबांना रंग देण्यात आला. ग्रामस्थांना रेनकोट वाटप केले. पेविंग ब्लॉग, डस्टबीन आदी उपयुक्त वस्तू देऊन विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेची पाहणी खासदार लंके यांच्याकडून करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून गड किल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहीम करण्याचा निर्णय घेतला असून आतापर्यंत शिवनेरी व  धर्मवीर गडावर स्वच्छता व संवर्धन करण्यात आले आहे. २७  एप्रिल १६४५ रोजी छत्रपती शिवरायांनी आपल्या जिवलग सवंगड्याच्या साथीने याच रायरेश्वर गडावरील मंदिरात स्वराज्याची शपथ घेऊन ती सत्यात उतरवण्याचे काम केले. त्यामुळे आज पवित्र भूमी असलेला रायरेश्वर किल्ला निवडला असून  असल्याचे सांगून या मोहीमेच्या माध्यमातून ‘आपला मावळा’ या संघटनेची स्थापना करून कमिटी नेमण्यात आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी प्रत्येक गडावर जाऊन गड किल्ले व संवर्धन संकल्पना रावणार असल्याचे खासदार लंके यांनी सांगितले. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी रामेश्वर निमसे, कार्याध्यक्षपदी सुधीर लाकुडझोडे, उपाध्यक्षपदी दौलत गांगडे व योगिराज गाडे, सचिवपदी सिताराम काकडे, सहसचिवपदी अमोल झेंडे तर खजिनदारपदी अल्ताफ शेख यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
खासदार लंके हे शिवभक्तांसह शनिवारी दि.२४ रोजी रात्री गडाच्या पायथ्याशी असलेल्या टिटेघर वडतुंबी येथील विद्यालयात मुक्कामी होते. रविवारी सकाळी सर्व साहित्य घेऊन शेकडो शिवभक्तांसह गडावर पोहचले. यावेळी लंके यांनी स्वतः हातात झाडू घेऊन मंदीरात स्वच्छता केली व वृक्षारोपण केले. यावेळी वयोवृद्ध, तरुण, महिला व लहान मुले मुली उपस्थित होते. दरम्यान गडाच्या पायथ्याशी नाष्टा व भोजनाची व्यवस्था संघटनेकडून करण्यात आली होती.

ऐन अवकाळी पावसात रायरेश्वरावर गडाची चढाई
सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असतानाही लोखंडी शिडीवरुन रायरेश्वरावर खादार लंके सहित वयोवृद्ध, महिला, लहान मुलांसह तरुणांनी वृक्षांची रोपे, टिकाव फावडे, मोठाले रांजण, घमेली , डस्टबीन घेत लोखंडी फलकांसह अवजड वस्तू गडावर पोहोच केल्या. तसेच विज प्रवाह बंद करुन कार्यकर्त्यांकडून पावसात विजेच्या खांबावर चढून दिवे जोडण्याचे काम करण्यात आले.

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

August 14, 2025
Next Post

Bhor News - तब्बल ३३ वर्षांनी भरला दहावीचा वर्ग ; जुन्या आठवणींना  उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group