Tuesday, June 9, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor – बारे बुद्रुकला पुण्यातील राष्ट्रीय सेवेच्या विद्यार्थ्यांचा एक दिवस बळीराजासाठी उपक्रम

by कुंदन झांजले
July 14, 2025

भोर‌ तालुक्यातील बारे बुद्रुक येथे रविवार (दि.१३) पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस बळीराजासाठी देत  सामाजिक उपक्रम राबवत भात पीकाची लागवड केली . शेतीतील पारंपरिक व आधुनिक तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी भात लागवड करण्याबरोबर, झाडांच्या रोपांची लागवड केली आणि शेतकऱ्यांकडून खरीप हंगामातील इतरही पिकांच्या मशागतींबाबतची माहिती करून घेतली.

 बारे बुद्रुक (ता.भोर) येथील दशरथ सिताराम दानवले यांच्या भात खाचरात भाताच्या रोपांची लागवड सुरू असताना या विद्यार्थ्यांनी भात लावणी करण्यासाठी खाचरात उतरून भाताच्या रोपांची काढणी, बांधणी, रोपांची वाहतूक, खाचरात चिखल करताना बैलांच्या पाठीमागून फिरणे , त्यासाठी औत उचलून मदत करणे, मशागत करणे , जपानी पध्दतीने भाताच्या रोपांची सरळ रेषेत लागवड, खाचरात बांध घालून पाणी साठवण्याची पद्धत अशी वेगवेगळी कामे केलीत. त्यासाठी विद्यार्थ्यांना सुनिल दानवले यांनी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले . यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एस बोरमाने यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. नाना शेजवळ यांच्यासह १४ विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते .भात लावणीच्या वेळी शेताच्या बांधावर बसून भाजी भाकरी खाण्याची अनोखी मजा विद्यार्थ्यांनी अनुभवली.
भात लावणी करताना ती एखाद्या अन्नसाखळीप्रमाणे असल्याने प्रत्येक विद्यार्थी त्या साखळीत सहभागी झाला.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

यावेळी महाविद्यालयातील शिवाजी माने ,भक्ती घाडगे ,साक्षी विभुते ,शुभम गोरे, प्रज्वलित ससाने , ओमकार चव्हाण , श्रीनाथ वाटणवर , श्रेया बोडा , दीक्षा बुधवणकर , सूर्या शिंदे
ऋतिक वाळुंजकर , स्वप्निल पवार , किरण तोंडचोरे , प्रतिक दानवले हे राष्ट्रीय सेवेचे विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

Bhor - विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी केले डिजिटल मतदान ; विद्यार्थ्यांचा निवडणूकीत उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group