भोर : तालुक्यात शहरासह ग्रामीण भागातून सर्वत्रच गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात व ढोल ताशांच्या गजरात झाले.शहरात अनेक मंडळांनी विद्युत रोषणाई करत गणेशाचे आगमन केली आहे तर ग्रामीण भागातील सर्व मंडळांनी ढोल ताशांच्या गजरात गणरायाचे स्वागत करून स्थापना केली.
गणरायाच्या प्रसादासाठी बनवलेले मोदक अजूनही ग्रामीण भागातून आपल्या शेतात टाकण्याची पद्धत पूर्ववत पारंपारिक पद्धतीने अवलंबली जात आहे. ग्रामीण भागातून अनेक जण आपल्या घरात, शेतात , घराच्या परिसरात मोदक टाकतात .
मोदक टाकल्याने गणेशाचा प्रसाद म्हणून घराला कोणत्याही प्रकारचे भादा होत नाही तसेच शेतात मोदक टाकल्याने पीकही मोठ्या जोमात येते, पिकाला कोणत्याही प्रकारचे किडीचा ,अथवा जीव जंतूंचा प्रादुर्भाव होऊ नाही यासाठी मोदक टाकले जातात.गणेशाचे वाहन उंदीर असल्याने उंदरास मोदक प्रिय आहेत .
मोदक टाकल्याने शेताला ,घराला कोणत्याही प्रकारचे उंदीर लागु नये म्हणून ही प्रथा पुर्ववत पारंपरिक पद्धतीने अवलंबली जात आहे.