भोरः नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत गेल्या २ वर्षांतील महायुतीचे रिपोर्टाकार्ड सर्वांसमोर मांडले. याच धरतीवर भोर विधानसभा क्षेत्रातील महायुतीच्या घटक पक्षातील नेते मंडळीनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा संक्षिप्त स्वरुपात मांडला. यामध्ये राज्यात घेण्यात आलेल्या निर्णय, प्रकल्प, योजना आदी गोष्टींची माहिती देण्यात आली. तसेच महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याचे काम एकदिलाने करणार असल्याचा निर्धार पत्रकार परिषद घेत करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजित शिवतरे यांनी सरकाने राबलेले विविध प्रकल्प आणि योजना या विद्यार्थी, शेतकरी, सर्वसामान्य माणसांच्या हिताच्या असल्याचे सांगितले. समाजातील सर्व घटकांना सामावून सरकारने निर्णय घेतले असून, लाडकी बहीण योजनाचा फायदा महिलांना झाला असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. महायुती पञकार परिषद शिवरे ता भोर येथील हॅाटेल रामकृष्ण येथे झाली. यावेळी माजी आमदार शरद ढमाले, कुलदीप कोंडे, रणजीत शिवतरे, चंद्रकांत बाठे, जीवन कोंडे, अमोल पांगारे, प्रकाश तनपुरे, विकास चव्हाण, बाळासाहेब जायगुडे, दिपक बर्डे, प्रशांत दानवले, राजेंद्र वाघ, दिपक करंजावणे, राजेंद्र रेणुसे, सुधीर शेडगे, किरण राऊत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या पत्रकार परिषदेचे प्रस्ताविक भाजपाचे भोर तालुकाध्यक्ष यशवंत डाळ, नितिन सोनावले, कुनाल धुमाळ यांनी केले.
तुम्ही निवडणुका आल्यावर बोलता..
चांगलं काम झालं ते माझ्यामुळे नाही झालं तर दुसऱ्यामुळे असे सध्या चालू आहे. १५ वर्षांत सत्ता असून देखील काहीही झाले नाही. भोरच्या एमआडीसीबाबात ते म्हणतात विरोधक विरोध दर्शवित आहेत. पण मला त्यांना सांगायचं आहे, ज्यांचा विरोध आहे त्यांना तुम्ही विश्वासात घेतलं का, असा सवाल रणजित शिवतरे यांनी केला. विरोध झाला म्हणून सांगायचं १५ वर्ष सत्ता असून तसेच संधी मिळून देखील भोर एमआयडीसीचा प्रश्ना का सुडविता आला नाही, असा प्रश्न शिवतरे यांनी उपस्थित केला. यामुळे तुम्ही भरकटत आहे, त्यामुळे विकासकामांबाबात बोला असे ते म्हणाले.
महायुती म्हणून आम्ही ‘एकत्र’
महायुती म्हणून आम्ही एकत्रित आहोत हा संदेश भोरच्या जनतेमध्ये जावा, यासाठी ही पत्रकार परिषदेत घेतली असल्याचे कुलदीप कोंडी यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेमध्ये किरण दगडे आणि बाळासाहेब चांदेरे हे उपस्थित नसले तरी ते महायुतीसोबत असल्याची माहिती कोंडे यांनी दिली. सध्या धडफड तडफड सुरू आहे, ती जर कामात दाखवली असती तर चित्र वेगळे असते असा टोला कोंडे यांनी लगावला. सध्या महायुतीचे काम बोलत आहे. निधी मिळत नाही म्हणून आंदोलन करायचे आणि त्याच निधीची विकासकामे करून कार्यक्रम घ्यायचे असा आरोप त्यांनी विद्यामान आमदारांवर केला.
भोरची परिस्थिती आहेत तशीच…!
भोरचे एक दोन रस्ते सोडले तर आहे तशीच परिस्थिती असल्याचे भाजपचे शरद ढमाले म्हणाले. १५ वर्षं झाली आहेत, मंत्रीपद, अध्यक्ष आदी मिळणार अशी चर्चा केली जाते तुम्ही काय पण व्हाल पण भोरच्या जनतेमध्ये काय बद्दल झाला असा खोचक सवाल ढमाले यांनी थोपटे यांना केला. तसेच सध्या जनेतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.