भोर : राजगड ज्ञानपीठाच्या अनंतराव थोपटे महाविद्यालय, भोर येथील प्राचार्य डॉ. प्रसन्न देशमुख यांचे लिहिलेले पुस्तक “इंटरनॅशल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट न्यू टेक्नॉलॉजी अँड टेक्निक्स” याचे आंतरराष्ट्रीय आवृत्तीचे प्रकाशन श्रीलंकेत भव्यदिव्यरीत्या झाले. श्रीलंकेचे शिक्षणमंत्री श्री एस. अरविंधकुमार यांचे हस्ते या ग्रंथाचे अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमात बोलताना श्रीलंकेचे शिक्षणमंत्री म्हणाले, “डॉ. देशमुख यांचे हे पुस्तक मानवी संसाधन विकासावर नवीन दृष्टिकोन मांडते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मानवी संसाधन विकास कसा करता येईल याचे मार्गदर्शन या पुस्तकात स्पष्टपणे केले आहे. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून होणारी प्रगती या पुस्तकात उल्लेखनीयपणे मांडण्यात आली आहे.”
डॉ. देशमुख यांचे हे पुस्तक जगातील प्रत्येक देशाची प्रगती ही त्या देशातील मानवी संसाधन विकासावरच अवलंबून असते हे स्पष्ट करते. पुस्तकात जगातील अनेक देशांची उदाहरणे देऊन हा मुद्दा अधिक प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
या कार्यक्रमास श्रीलंकेतील तज्ञ अभ्यासक, मलेशिया आणि फ्रान्समधील विविध विद्यापीठांतील अभ्यासक तसेच भारतातील मान्यवर उपस्थित होते.
डॉ. देशमुख यांच्या या पुस्तक प्रकाशनाबद्दल राजगड ज्ञानपीठाचे कार्याध्यक्ष आमदार संग्राम दादा थोपटे आणि संस्थेच्या मानद सचिव स्वरुपाताई थोपटे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
डॉ. प्रसन्न देशमुख यांच्याबद्दल:
डॉ. प्रसन्न देशमुख हे राजगड ज्ञानपीठाच्या अनंतराव थोपटे महाविद्यालय, भोर येथे प्राचार्य असून “जर्नल ऑफ कॉमर्स अँड मैनेजमेंट थॉट” या मान्यता प्राप्त रिसर्च जर्नलचे मुख्य संपादक आहेत. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ११० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत आणि ४७ विद्यार्थ्यांना पीएच.डी. साठी मार्गदर्शन केले आहे.