Thursday, August 27, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा

by SBPRNL
February 2, 2026
राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा

भोर : भोंगवली–कामथडी जिल्हा परिषद गटातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रचाराला चांगलाच वेग दिला आहे. भोर तालुक्यातील सर्वांत हाय व्होल्टेज जिल्हा परिषद गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गटात आता थेट आमदार शंकर मांडेकर यांनी स्वतः मैदानात उतरत प्रचाराची सूत्रे हातात घेतली आहेत. आज आयोजित करण्यात आलेल्या कोपरा सभेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, या सभेतून राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून विक्रम खुटवड, भोंगवली पंचायत समिती गणातून गणेश निगडे, तर कामथडी पंचायत समिती गणातून तृप्ती खुटवड हे अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तिन्ही उमेदवारांनी गेल्या काही दिवसांपासून गावागावात संपर्क दौरे, बैठका, घराघरांत जाऊन जनसंवाद साधत प्रचाराची मजबूत पायाभरणी केली आहे. आता आमदार शंकर मांडेकर यांच्या थेट सहभागामुळे प्रचाराला अधिक धार येणार असल्याचे चित्र आहे.

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

आजच्या कोपरा सभेत आमदार मांडेकर राष्ट्रवादीच्या माध्यमातून गेल्या काळात झालेल्या विकासकामांचा आढावा घेण्याची, तसेच विरोधकांच्या कारभारावर जोरदार टीका करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. “जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या ग्रामीण विकासाची खरी केंद्रे असून, येथे सक्षम, अनुभवी आणि लोकाभिमुख नेतृत्वाची गरज आहे,” असा ठाम संदेश देत ते मतदारांना राष्ट्रवादी उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन करणार असल्याची चर्चा आहे.

विक्रम खुटवड यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण यासह सर्वांगीण विकासावर भर देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. गणेश निगडे आणि तृप्ती खुटवड यांनीही गावकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, या हाय व्होल्टेज गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाल्याने राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. पक्षातील नाराज नेते चंद्रकांत बाठे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने लढत अधिक रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आजची कोपरा सभा ही केवळ प्रचाराचीच नव्हे, तर आगामी निवडणुकीच्या दृष्टीने निर्णायक ठरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे बारकाईने लक्ष आहे.

जोगवडी-दुपारी:४.00

धांगवडी-सायं: ५.३0

न्हावी-सायं ७.००

भोंगवली-सायं ८.30

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post
भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड

भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group