भोरः राज्यात सध्या हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात फसवूण त्यांच्यावर अत्याचार करुन निर्घणपणे त्यांची हत्या केल्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. लव्ह जिहादने गंभीर स्वरुप धारण केलेले असून, राज्यात लवकरात लवकर लव्हजिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याची मागणी सकल हिंदू समाज भोर यांच्यावतीने भोरचे तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. यावेळी मिलिंद एकबोटे, यशवंत डाळ, अतुल काकडे, अक्षय पवार, विनायक सणस, सोमानाथ ढवळे, संजय भेलके, युवराज जेधे, आप्पा मळेकर, अमर बुदगुडे, पल्लवी फडणीस, बाळासो खुटवड, राहुल पारठे, गणेश बांदल, विकास बांदल, श्रीकांत बो-हाडे, विश्वजित चव्हाण, राहुल शिंदे, दिपक शेटे, संदीप शेटे, गजानन शेटे, नितिन सोनावले, राजेंद्र गुरव मोर्चात सहभागी झाले होते. शहरातून मिलींद एकबोटे यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा देखील काढण्यात आला.
या प्रकरणांमध्ये एकूणच खोटे व नाव खोटी ओळख सांगूण मुलींना फसवणे, महागडी गाडी गिफ्ट देणे, राहणीमान चांगले दाखविणे अशा अनेक माध्यमांमधून हिंदू मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यात येते. तसेच काही घटनांमध्ये त्यांचे धर्मांतर देखील करण्यात आल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. अनेक घटनांमध्ये मुलींना ब्लॅकमेलिंग करण्यात येते. काही घटना तर हृदय पिळवटून टाकणाऱ्या असतात. आदी गंभीर स्वरुपाचे प्रकार घडलेले आहेत. यामुळे राज्य सरकारने यावर कठोर कायदा करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच राज्याच्या भावी पिढीचा आणि तिच्या सुरक्षतेचा प्रश्न आहे, पुन्हा एकदा श्रद्धाचे ३५ तुकडे आपण होऊ देणार आहोत का? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
राज्यातून महिला आणि मुलींचे अपहरण होण्यामागचे कारण लव्ह जिहाद तर नाही ना याची चौकशी करण्यासाठी गृहखात्याने स्वतंत्र पथक नेमावे, राज्यात लवकरात लवकर लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा या प्रमुख मागण्यांसह आदी मागण्या सकल हिंदू समाज भोर यांच्यावतीने करण्यात आल्या आहेत.