भोर तालुका – जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नसरापूर–वेळू गणात भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ व निष्ठावंत नेतृत्व जीवन आप्पा कोंडे यांच्या उमेदवारीसाठी लोकांचा प्रबळ पाठिंबा निर्माण झाला आहे. गेल्या आठ वर्षांत भोर तालुक्यात भाजपचे अस्तित्व वाढवणे, संघटन उभी करणे आणि विकासकामांना गती देणे या सर्वांमध्ये कोंडे यांचे योगदान निर्णायक ठरले आहे.
2017 साली पक्षात प्रवेश केल्यानंतर कोंडे यांनी भोर तालुक्यात ग्रामीण स्तरावर पक्षाची मुळापासून उभारणी सुरू केली. घराघरात जाऊन लोकसंग्रह, शासन योजनांत मार्गदर्शन, तसेच जनतेच्या तातडीच्या अडचणी सोडवण्याच्या त्यांच्या कार्यशैलीमुळे भाजपकडे मोठ्या प्रमाणावर लोक आकर्षित झाले. आज भोर तालुका आणि शहर मिळून 400 ते 500 सक्रिय कार्यकर्त्यांची भक्कम संघटना उभी राहिली आहे.
कोंडे यांच्या नेतृत्वावरचा पक्षाचा विश्वास तीन वेळा सलग तालुकाध्यक्षपद देऊन पक्षाने दाखवला. यानंतर त्यांची पुणे जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती झाली आणि त्यांनी 2022–2025 दरम्यान तब्बल 130 ते 140 गावांमध्ये ₹80–90 कोटींची विकासकामे पूर्ण केली. रस्ते, पाणीपुरवठा योजना, सभामंडप, स्मशानभूमी विकास, जिम साहित्य, पूल, विद्युत पुरवठा सुधारणा अशा कामांमुळे ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी चालना मिळाली.
सत्ता नसतानाही जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून 40 ते 50 आंदोलने करण्याचा इतिहास कोंडे यांनी घडवला. टोलनाका, स्थानिक बाजारातील समस्या, किकवी–नसरापूरमधील लोकअडचणी, तसेच एमएसईबीच्या त्रुटींमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी निधी मिळवून ट्रान्सफॉर्मर्स व लाइन सुधारणा केली.
2025 च्या निवडणुकीसाठी वेळू–नसरापूर गणातील बूथ रचना कोंडे यांनी मजबूत केली असून प्रत्येक गावात 10–12 सदस्यीय बूथ समित्या सज्ज आहेत. कार्यकर्त्यांपासून ग्रामस्थांपर्यंत सर्वच स्तरांतून आज एकमुखी मागणी होत आहे—“जुन्या निष्ठावंतांना न्याय द्यावा, आणि जिल्हा परिषद उमेदवारी जीवन आप्पा कोंडे यांनाच द्यावी!”
विकास, संघर्ष, जनसंपर्क आणि निष्ठा यांची भक्कम पायाभरणी असलेले कोंडे हे या गणातील सर्वात समर्थ उमेदवार मानले जात आहेत.

















