Sunday, August 23, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

by SBPRNL
June 22, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोर, प्रतिनिधी : भोर-महाड महामार्गावरील वेनवडी गावाच्या हद्दीत वनविभागाने धडक कारवाई करत खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडले. सोमवारी (ता. २२) पहाटे साडेबारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वनविभागाच्या पथकाकडून महामार्गावर नियमित वाहन तपासणी सुरू असताना पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहन (एमएच १२ डब्ल्यूएक्स २०७१) संशयास्पद आढळल्याने ते थांबवून तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनामध्ये खैर प्रजातीच्या लाकडांचे ओंडके आढळून आले. संबंधितांकडे लाकडांच्या वाहतुकीसाठी आवश्यक परवानगी अथवा वैध कागदपत्रे नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर वाहन ताब्यात घेण्यात आले.

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

या कारवाईत अंदाजे एक लाख रुपये किंमतीची खैराची लाकडे तसेच सुमारे तीन लाख रुपये किंमतीचे पिकअप वाहन असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी भरत बबन चव्हाण (रा. आखले, ता. जि. सातारा) यांच्याविरुद्ध वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.

पुणे येथील उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस तसेच सहाय्यक वनसंरक्षक शितल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भोरचे वनक्षेत्रपाल शिवाजी राऊत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकामध्ये वनपाल सुग्रीव मुंढे, वनरक्षक के. एम. हिमोणे व वनरक्षक सुदाम राठोड यांनी सहभाग घेतला.

जप्त करण्यात आलेले पिकअप वाहन व खैर लाकडांचा साठा वनविभागाच्या ताब्यात घेऊन भोर येथील वनविभागाच्या डेपोमध्ये जमा करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वनपाल सुग्रीव मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून अवैध वृक्षतोड व लाकूड तस्करीविरोधात वनविभागाकडून कारवाईचा बडगा कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group