Sunday, August 23, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिस, बचाव पथक व ग्रामस्थांची डोंगर चढून मोठी कसरत

by SBPRNL
June 21, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

इम्रान आतार,भोर

भोर, प्रतिनिधी : भोर तालुक्यातील वेणुपुरी हद्दीतील नीरा देवघर धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील चार मित्रांपैकी एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता. २१) पहाटे सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. देवेश राज मिश्रा (वय २८, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून, याप्रकरणी त्यांचे नातेवाईक राजकुमार गौरीशंकर मिश्रा यांनी भोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील चार मित्र शनिवारी रात्री पर्यटनासाठी भोर तालुक्यातील वेणुपुरी परिसरात आले होते. रविवारी पहाटे सर्वजण नीरा देवघर धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. यावेळी देवेश मिश्रा यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा तोल गेला आणि ते खोल पाण्यात बुडाले. मित्रांनी तातडीने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश न आल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच भोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली हिर्डोशी बिट अंमलदार अजय साळुंके, पोलिस कर्मचारी अभय बर्गे, राजेंद्र दुरगुळे, हेमंत भिलारे तसेच कोंढरीचे पोलिस पाटील शंकर पारठे यांनी घटनास्थळी धाव घेतली. भोईराज जल आपत्ती संघाचे उमेश गुजर, जगन शिर्के, शंभू सागळे, मंगेश कांबळे, विष्णू मोहिते व सुनील पवार यांनी पोलिसांच्या मदतीने अथक शोधमोहीम राबविली. काही तासांच्या प्रयत्नांनंतर देवेश मिश्रा यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.

घटनास्थळापासून वेणुपुरी गाव सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असून परिसर पूर्णपणे डोंगराळ असल्याने मृतदेह रुग्णवाहिकेपर्यंत आणण्यासाठी पोलिस, बचाव पथक आणि ग्रामस्थांना भर उन्हात मोठी कसरत करावी लागली. अखेर मृतदेह डोंगराळ मार्गाने वाहून आणत रुग्णवाहिकेतून भोर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group