भोरः मुंबईतील बदलापूर येथील दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल जन आंदोलन सुरू होते. यावेळी दैनिक सकाळच्या पत्रकार मोहिनी जाधव या वार्तांकन करून आपले पत्रकारितेचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत होत्या. आपले कर्तव्य बजावत असताना बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हेत्रे यांनी पत्रकार मोहिनी जाधव यांना अर्वाच भाषा वापरली. तसेच मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या प्रकाराचा निषेध अनेक घटकांकडून नोंदविण्यात येत आहे. या प्रकरणी भोर पत्रकार संघाच्या वतीने तहसिलदार भोर येथे मा. नगराध्यक्ष्य वामन म्हेत्रे यांच्याविरोधात कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले आहे.
नव्या पत्रकार संरक्षण कायदा व भारतीय संविधान कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून म्हात्रे यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन पत्रकार संघ भोर यांच्या वतीने तहसिदार यांना देण्यात आले आहे. यावेळी संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मुसळे, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, सचिव संतोष म्हस्के, सहसचिव कुंदन झांजले व खजिनदार विक्रम शिंदे उपस्थित होते.