Friday, June 12, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

दोन लाख भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन

by SBPRNL
September 3, 2024
दोन लाख भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन

 सासवड प्रतिनिधी : पूर्ण राज्यात एक जागृत देवस्थान म्हणून नावारुपाला आलेल्या पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील माळशिरस येथील श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे आज श्रावणातील पाचव्या  सोमवारी सासवड येथील मानाच्या तेल्या भुत्याच्या कावड मिरवणुकीने याञेची सांगता करण्यात आली .मंदिराच्या मुख्य शिवलिंगावरती आकर्षक फुलांची सजावट करुन निलकंठेश्वर पुजा साकारण्यात आली. शिवलिंगाची आकर्षक पुजा पाहुन भाविकांच्या डोळ्यांचे पेरणे फाटले.दिवसभरात दोन लाख भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले.

आज पहाटे शिवलिंगास दही ,दुध व पंचामृतने आंघोळ घालण्यात आली.पहाटे पाच वाजता माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने महाआरती करुन मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. सकाळी माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने दक्षिण मध्ये मुंबईचे माजी खासदार राहुल शेवाळे, यांनी  महापुजा केली .महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष कांचन राहुल कुल,भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे संचालक विकास शेलार भुलेश्वर देवस्थान अध्यक्ष अरुण यादव,माळशिरसचे उपसरपंच अशोक यादव,युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष माऊली यादव,ह भ प लक्ष्मण महाराज यादव,यांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

दुपारी बारा वाजता पाण्याच्या कुंडापाशी भुलेश्वरास मानकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आंघोळ घालण्यात आली.  महाआरती करुन ढोल ताश्यांच्या गजरात कावड मिरवणूक काढण्यात आली. पाठीमागे बाप्पा मोरया रे ” या भजनाच्या तालावरती पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी “हर हर महादेव ” च्या जयघोषाने भुलेश्वर डोंगर दणाणून गेला. दुपारी चार वाजता मंदिराच्या प्रवेश द्वारावरती मानाच्या कावडींची धार घालण्यात आली. त्यानंतर पालखीची महाआरती करुन भुलेश्वर याञेची सांगता करण्यात आली.

वहाने वनविभागाच्या कमाणीबाहेर अडवण्यात आल्याने वाहतुक कोंडी झाली नाही. जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य सेवा देण्यात आली.वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात आला होता.माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. दिवसभरात अनेक भाविकांनी अन्नदान केले.शिवलिंगाची फुलांची सजावट करण्यात आली.साडे चार वाजता भुलेश्वरच्या पालखीचे माळशिरस गावाकडे प्रस्थान करण्यात आले .माळशिरस गावात पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. राञी नऊ वाजता पालखीची गावात मिरवणुक काढण्यात आली.हर हर महादेवचा जयघोषाने महीनाभर सुरु असणा-या याञेची सांगता करण्यात आली.

Tags: Bhorpurandar
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
भोर:  एसटी बस सेवा बंद, महाराष्ट्रभर एसटी कर्मचाऱ्यांचे अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन

भोर: एसटी बस सेवा बंद, महाराष्ट्रभर एसटी कर्मचाऱ्यांचे अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन

ताज्या बातम्या

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group