भोर: महायुतीतचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर हे दोन दिवसीय भोर तालुका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान मांडेकरांनी तालुक्यातील विविध गावांना भेट देत नागरिकांशी संवाद साधत आहेत. पक्षाचा अद्यादेश डावलून ज्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे, त्यांना मतदान करणे म्हणजे काँग्रेसला मतदान केल्यासारखा असल्याचे मांडेकर यावेळी म्हणाले. तसेच त्यांना मत देऊन आपले बहुमुल्य मत वाया घालवू नका, असे आवाहन मांडेकर यांनी केले आहे. काँग्रेसने महायुतीची मते खाण्यासाठी हे उमेदवार दिले असल्याचे मांडेकर यावेळी म्हणाले.
५० वर्ष एकाच घरात सत्ता असूनही मतदारसंघाचा विकास झाला नाही. या घराणेशाहीला जनता आता कंटाळली आहे. या निवडणुकीमध्ये जनता माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून देऊन घराणे शाही संपवणार असल्याचा विश्वास मांडेकरांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. या दौऱ्याला भोर तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मांडेकर यांच्यावर ठिकठिकाणी जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. या दौऱ्यात त्यांच्या समवेत प्रचार निरीक्षक वाय. ए. नारायण स्वामी, , रणजीत शिवतरे, विक्रम खुटवड, जीवन कोंडे, सुनील चांदेरे, संतोष घोरपडे, अशोक शिवतरे, बाळासाहेब गरुड, स्नेहल दगडे, किसन नांगरे, सचिन आमराळे ,संतोष घोरपडे, दशरथ जाधव, सुनील गायकवाड हे महायुतीतील नेते पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.