Thursday, June 4, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

सामाजिक – डिजेला आवरा , तरुणाईला सावरा

by कुंदन झांजले
December 24, 2024

डीजेचे डॉल्बीचे नियम कागदावरच ; कर्णकर्कश आवाजाने  ज्येष्ठांना वयोवृद्धांना ,लहान मुलांना त्रास

सध्या सर्वत्र धुमधडाक्यात लगीन सराई चालू झाली असून जो तो आपले लग्न कसे जोमाने, जोरात होईल याकडे लक्ष देत आहे. म़ोठ्या आवाजाचा डिजे असेल तर लग्न सोहळा जोरदार असे सध्या चित्र पहायला मिळत आहे. घरातील व छोटे मोठे कार्यक्रम म्हटले तर डीजे साउंड सिस्टीम पाहीजेच असे आजचे तरुण घरात सांगत आहेत. तरूणाईनेही व्यवसाय म्हणून डिजेला पसंती दिली असुन सर्वत्र डिजेंची संख्याही भरमसाठ वाढल्याने जोशात असलेली तरूणाई ध्वनीप्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून कार्यक्रमातुन दिवस रात्र कर्णकर्कश आवाजात डिजे वाजवत आहे त्यामुळे डिजेला आवरा , नवख्या तरुणाईला सावरा असे चित्र निर्माण झाले आहे.
             हल्ली शहरासह , ग्रामीण भागात कुंकू, साखरपुडा, लग्न ,बारसे, मुंज, जावळ, वाढदिवस, उटणे हळद, नवरदेव पाया पडणे, वास्तुशांती, देवांचे कार्यक्रम, श्रीवंदन , लग्नवरात, लग्नाची पूजा असा सर्वच कार्यक्रमातुन डिजे डॉल्बीचे फॅड वाढले आहे. हौसेला मोल नाही याप्रमाणे प्रत्येकजण आपली प्रतिष्ठा पणाला लावून कितीही खर्च झाला तरी आपले शुभकार्य कसे मोठे होईल याकडे लक्ष देत आहेत यामध्ये नवख्या तरुणाईचा आग्रह मोठा आहे.जुन्या चालीरीती रुढी परंपरा संस्कृतीचा विसर पडत चालला आहे.  भव्य नवरदेव पायापडणी सोहळा, भव्य हळद उटणे , नवरदेव श्रीवंदन ,भव्य दिव्य वरात असे लग्नाचे नवीनच सोहळे बॅनर तयार होत असुन डिजे साऊंड सिस्टीम, फोकस लाईट डिझाईन यांचा प्रसार वाढत आहेत.

You might also like

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

         या कार्यक्रमांतुन वाजणा-या प्रचंड मोठ्या आवाजाच्या वाजणा-या डिजेंमुळे जेष्ठ, वयोवृद्ध व आजारी नागरिकांना व लहान मुलांना मोठा त्रास होत आहे. कानाचे पडदे फाटतील अशा कर्णकर्कश मोठया आवाजाने हृदयाचे ठोके वाढविणारी धडधड व डोळ्यांनाही अतिनील लेजर लाईट, फोकसच्या किरणांमुळे प्रचंड त्रास होत आहे हृदयाला ,शरीराला कितीही हादरे बसले ,तरी आजची तरुणाई मात्र या डिजेवर बेभान होऊन थिरकताना, नाचताना दिसत आहे. काही अतिउत्साही कार्यकर्त्यांचे महागडे मोबाईल फोन या उत्साहाची शुटींग करताना या लेझर लाईटने बिघडले जात आहेत. प्रशासनाकडूनही डीजेला सहज परवानगी मिळत असुन व आवाजाच्या क्षमतेचे, डेसिबलचे नियम कागदावरच राहत असुन प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे.
‌ ‌              शहरात पेठेतुन, बंदिस्त गावात किंवा वाडी वस्तीवर असणारी रात्रीची डिजेची वरात , हळद उटणे, मोठ्या आवाजाच्या धक्क्याने, दणदणाट होऊन धडकी भरणा-या आवाजाने दुमदुमून घरातील भांडी, वस्तू जमिनीवर पाडत आहेत. परंतु शुभ कार्य असल्याने कोणी काहीच बोलत नाही. रात्री घरातील कुटुंबातून बाहेर पडलेली आजची नवखी तरुणाई बाहेर जाऊन काय करते हे मात्र आई-वडिलांच्या लक्षात येत नाही हळूहळू अशाच रात्रीच्या बाहेर राहण्याने तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत. यातुन हळूहळू गुन्हेगारी‌ देखील डोके वर काढत आहे. आपल्याला कोणीतरी बघत असेल याचे भान न ठेवता हि तरुण मुले नाचण्यात एवढी दंग असतात की वेडेवाकडे चाळे करत नाचत ,ओरडत आरडत हि तरुणाई वेडी बेभान होत नाचत आहेत याचाच परिणाम पुढे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर होताना दिसत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर डीजेला आवरा व तरुणाईला सावरा असे जुने बुजुर्ग सांगत आहेत.

” बेफिकिरपणे आणि नियमबाह्य डीजे चालविणाऱ्यांवर व डिजे मालकांवर गुन्हा दाखल केला जाईल. ब-याच ठिकाणी मुले अभ्यास सोडून डिजेच्या मागे फिरत असतात .पालकांनी १०ते १६ वयोगटातील मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.ऐन तारुण्यात पदार्पण करताना मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत. समाजाचे नूकसान करणा-यांवर आणि बेकायदेशीररित्या, कायदा सुव्यवस्था मोडणा-यांवर कडक कारवाई केली जाईल”                                              अण्णासाहेब पवार -पोलीस निरीक्षक भोर पोलीस स्टेशन.

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोर वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर साष्टांग प्रणाम आंदोलन; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

August 13, 2025
ताज्या बातम्या

Bhor- रास्ता रोको आंदोलन !! भोरला रस्त्यांसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा एल्गार  ; भोर- कापूरव्होळ रस्त्यांची दयनीय अवस्था ; शाळेच्या विद्यार्थ्यांसह भोलावडे पंचक्रोशीतील नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन

August 5, 2025
Next Post

Bhor- सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी हत्येच्या निषेधार्थ भोर तालुका सरपंच परिषदेच्या वतीने निषेध

ताज्या बातम्या

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

May 30, 2026
न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

May 26, 2026
“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

May 26, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

RajgadNews.Live हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य स्थानिक मराठी न्यूज पोर्टल आहे. आमचे मुख्य उद्दिष्ट जगभरातील आमच्या वाचकांसाठी ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वपूर्ण माहिती अचूकपणे आणि थेट मराठीत पोहोचवणे हे आहे. राजकीय, सामाजिक, क्रीडा असो वा स्थानिक घडामोडी, महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील बातमी आम्ही तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवतो.

Follow Us

Copyright © 2026. Rajgad News.live

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. Rajgad News.live

WhatsApp us