Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

सामाजिक – भोरला हळदी कुंकू समारंभात विधवांचा सन्मान ; विधवा न संबोधता गंगाभागिरथी नावाने महिलांचा गौरव

by कुंदन झांजले
January 20, 2025

उन्नती महिला प्रतिष्ठान व तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून अध्यक्षा सीमा तनपुरे यांचा नाविन्यपूर्ण महत्वचा उपक्रम

भोरला उन्नती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व तनिष्का व्यासपीठा सदस्या सीमा तनपुरे या नेहमीच सामाजिक लोकोपयोगी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात असाच एक उपक्रम म्हणजे विधवा महिलांचा हळदी कुंकू समारंभ असा उपक्रम घेत या महिलांचा सन्मान भोर मधील नागोबा आळीतील गणेश मंदिरात करण्यात आला. भोर शहर व ग्रामीण भागातील ५० विधवा महिलांना निमंत्रित करुन त्यांची ओटी भरुन हळदी कुंकवाचा मान देत सन्मान करण्यात आला. विधवा महिलांना विधवा न संबोधता गंगाभागिरथी या नावाने संबोधले जावे असे सांगण्यात आले.याच वेळी विधवा प्रथा बंद करण्याची शपथ सर्व  महिलांनी घेतली.
          आपल्या समाजात अजूनही पतीच्या निधनानंतर तिच्या पत्नीस विधवा म्हटले जाते, तिला शुभकार्यात ,समाजात कमी स्थान दिले जाते. त्यांचे जीवन एक प्रकारे वेगळे असते. समाजातील या  महिलांविषयीच्या जुन्या रुढी बंद हाव्यात , सार्वजनिक ठिकाणी,  लग्न समारंभासह  इतर समारंभात त्यांना मान मिळावा, त्यांना सन्मानाची वागणूक दिली जावी असे तनिष्काच्या अध्यक्षा सीमा तनपुरे यांनी सांगितले. या विधवा महिलांना समाजात मानाचे स्थान प्राप्त व्हावे, त्यांना सर्व शुभकार्यात, सणावाराला, समारंभातुन मानाने जाता यावे यासाठी हळदी कुंकू समारंभात त्यांचा हळदी कुंकू लावून सन्मान करण्यात आला. कोणीही या महिलांना विधवा न संबोधता गंगाभागिरथी या नावाने संबोधले जावे असे आवाहन यावेळी अध्यक्षा सीमा तनपुरे यांनी केले. यावेळी या कार्यक्रमास भाग्यश्री वरटे, स्मिता सुर्वे , मीना चव्हाण, अश्विनी धोंडे, विजया डिंबळे , द्रोपदी भेलके , अर्चना रोमण, माधुरी दबडे अशा महिला उपस्थित होत्या .अनेक महिलांचा यावेळी सन्मान झाल्याने त्या भारावुन गेल्या काहींना अश्रू अनावर झाले.अत्यंत चांगला उपक्रम असुन याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

भोर तालुक्यातील कारी येथे ॲडव्हांटा एंटरप्रायजेस कंपनीकडून पाण्याच्या टाक्यांचे वाटप

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group