सासवडः पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जय भैरवनाथ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे नेते विजय जाधव व भटक्या विमुक्त जाती जमातीचे प्रतिनिधी यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये होणाऱ्या यशवंतराव चव्हाण पाल मुक्त वसाहत योजना जलद गतीने राबवण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या योजनेबाबत पुणे जिल्हाधिकारी यांचे पत्र देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांनी जिल्हाधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे संबंधित सर्व प्रशासनाला यासंबधी अवगत करण्यासाठी एक पत्रक देखील विभागांना देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत भटक्या विमुक्त जाती जमातीतील लाभार्थींना याचा फायदा होणार असून, ही योजना जलद गतीने राबविण्यासाठी आमदार संजय जगताप व विजय जाधव यांच्या नेतृत्वामध्ये काम सुरू असून लवकरच प्रत्येक लाभार्थ्याला आपल्या हक्काचे घर मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.