सासवड: प्रतिनिधी खंडू जाधव
येथे एमएससीबी (महावितरण) बोर्डामध्ये डीपीचे ऑइल बदलत असताना विजेचा धक्का बसून एका तरुण कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुनीर उर्फ भैया पापा भाई मनेर (वय 27 रा. सिद्धिविनायक सोसायटी, सोनोरी रोड, सासवड) असे मयत झालेल्या कामगाराचे नाव आहे. सासवड येथील एमएससीबी बोर्ड येथे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती ऑक्टोबर 2018 मध्ये तो कामावर रुजू झाला होता. एमएससीबी बोर्डमध्ये डीपीचे ऑइल बदलत असताना मोटरच्या कनेक्शनच्या स्थितीमध्ये पाऊस व त्या ठिकाणी चिखल असल्यामुळे मुनीरला शॉक बसला. त्या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्वरित त्याला माने हॉस्पिटल येथे नेले. परंतु, उपचाराआधीच डॅाक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मुनीरला शॅाक लागल्याचे त्याच्या भावला व चूलते यांना फोनवर सांगण्यात आले. त्यानंतर शकील यांनी आपले चुलते बाळाबाई हर्षुलाल मनेर हे सासवडच्या आठवडा बाजारात असताना शकिलचा फोन आल्यावर त्वरित ते माने हॉस्पिटल येथे पोचले. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये सकाळी साडेअकरा वाजता त्यांना डॉक्टरांनी तपासले असता, शॉक बसल्यामुळे मयत झाल्याचे डॉक्टर नितीन माने यांनी घोषित केले. त्यानुसार सासवड पोलीस स्टेशनला आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी हे पुढील तपास करीत आहेत.