बारामती (सनी पटेल) : शहरात चोरीचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसत असून, दिवसाढवळ्या नगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या समोर एका अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेत असताना आजूबाजूच्या लोकांनी या चोरट्याला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी.आण्णा पाटील वस्ती गुणवडी ता. बारामती जि. पुणे येथील एका २४ वर्षीय महिलेने बारामती पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी तोसीन गफार बागवान (वय 34 रा. कसाब गल्ली बारामती) या इसमाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि 26/08/2024 रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बारामती शहर हद्दीतमध्ये स्वामी समर्थ मंदिराच्या कडेला नगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयच्या समोर एक अज्ञात इसमाने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजूबाजूच्या लोकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. परंतू, अशा भर दिवसा चोऱ्या होत असल्याने बारामती शहरात राहणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या चोरांवर पोलीस कसा अटकाव करणारा याकडे सर्व बारामती शहराचे लक्ष लागले आहे.