Tuesday, June 9, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

संग्राम थोपटे यांनी रिंगरोडबाबत दिले ‘हे स्पष्टीकरण’: पुणे-सातारा महामार्ग लगतच्या गावांना भेट देत नागरिकांशी साधला संवाद

by Team Rajgad Publication
November 13, 2024
संग्राम थोपटे यांनी रिंगरोडबाबत दिले ‘हे स्पष्टीकरण’: पुणे-सातारा महामार्ग लगतच्या गावांना भेट देत नागरिकांशी साधला संवाद

भोर: महाविकास आघडी उमेदवार संग्राम थोपटे यांनी भोर तालुक्यातील पुणे सातारा महामार्ग लगतच्या गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. या भागातील सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे रिंग रोडचा होता. चुकीच्या सर्वेक्षणमुळे अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी त्यामध्ये जात होत्या, त्या संदर्भात रिंगरोड विरोधी कृती समितीच्या माध्यमातून उभारलेल्या लढ्याला मिळालेल्या यशामुळे केळवडे, कांजळे, खोपी, कांबरे, नायगाव ही गावे रिंग रोडमधून वगळण्यात आली असून, या पाच गावातील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील रिंगरोड आरक्षणाचे शिक्के करून शेतकऱ्यांना मोफत रिंग रोड मुक्त सातबाऱ्याचे वाटप केले असल्याची माहिती थोपटे यांनी यावेळी बोलताना दिली.

थोपटे यांनी  हरिश्चंद्री, खडकी, उंबरे, करंदी खे.बा. देगाव, कांबरे खे.बा. साळावडे, केळवडे, कांजळे, वरवे, शिवरे, खोपी, कासुर्डी खे.बा. कुसगांव, रांजे, ससेवाडी, शिंदेवाडी, वेळू या गावातील नागरिकांशी संवाद साधला.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

वेळू, शिंदेवाडी, ससेवाडी, खेड-शिवापूर व कासुर्डी या भागातील कंपन्यांमध्ये वाढती विजेचे मागणी पाहता व कंपनी व्यवस्थापकांना येणा-या विद्युत विषयक आडचणी जाणून घेऊन नवीन सबस्टेशन उभारणी करून त्या सोडविण्यासाठी एमएसईबीचे कार्यकारी अभियंता यांच्या समवेत बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केला असे थोपटे यावेळी म्हणाले.

कोविडच्या काळात ससेवाडी येथे ४८ ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर उभारून कोविड पेशंटला रेमडीसीवर इंजेक्शनसह उपचार सुविधा पुरविण्यात आल्या होत्या.

‘ही’ विकास कामांची थोपटे यांनी दिली माहीती

  • शिवरे रस्ता १ कोटी ६ लाख
  • शिवगंगा नदीवरील पुलाचे काम १ कोटी ५० लाख
  • कुसगांव खोपी कांजळे साळावडे ते वरवे बु.पुलाचे काम ५ कोटी ६२ लाख
  • केळवडे ते बनेश्वर रस्ता ५५ लाख
  • वरवे जोड रस्ता ८५ लाख
  • देगांव राव्हेकर वस्ती रस्ता करणे ७० लाख
  • देगांव मधील बंधारे ६५ लाख
  • खडकी उंबरे रस्ता ४४ लाख
  • वेळू येथे साकव ७० लाख
  • वेळू, कुसगांव, कुरुंगवडी नायगाव, देगांव, कामथडी नळपाणी पुरवठा योजना करणे यासाठी कोट्यावधी निधी
  • हरिश्चंद्र येथे को.प.बंधारा बांधणे २ कोटी ८० लाख
  • हरिश्चंद्री ते निगडे फाटा रस्ता करणे ४ कोटी ८० लाख

अशी कोट्यावधी रुपये निधी उपलब्ध करून या भागातील अनेक विकास कामे मार्गी लावण्यात आली असल्याची माहिती थोपटे यानी दिली. त्याचप्रमाणे पी एमआरडीए अंतर्गत येणारे रस्ते यासाठी निधी अनेक घरकुले मंजूर करून लाभार्थीना अनुदान मिळवून देण्याचे काम करता आले, या केलेल्या विकास कामांच्या माध्यमातून आपण मतदार बंधू भगिनी यांच्या पर्यंत पोहचत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मानसिंग बाबा धुमाळ, रवींद्र बांदल, माऊली शिंदे, शैलेश सोनवणे, आबासाहेब यादव, पोपटराव सुके, शिवाजी नाना कोंडे, अशोक आबा शेलार, माऊली पांगारे, अशोक वाडकर, हिरामण पांगारे, धनंजय वाडकर, लहुनाना शेलार, रोहन बाठे, आदित्य बोरगे, गणेश खुटवड, रणजित बोरगे, विद्या यादव, दुर्गा चोरघे, रुक्मिणी पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

Tags: BhormlasangramthopateRajgadnewd
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
भोर मतदारसंघाच्या प्रगतीसाठी सुवर्णकाळाचे आश्वासन – अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांचा संकल्प

भोर मतदारसंघाच्या प्रगतीसाठी सुवर्णकाळाचे आश्वासन – अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांचा संकल्प

ताज्या बातम्या

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group