शिरवळ : आशिर्वाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कापूसखेड इस्लामपूर जिल्हा सांगली यांच्या वतीने राज्यस्तरीय लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे युवा प्रेरणा पुरस्कार २०२४ कार्यक्रम ४ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात राज्यभरातून विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्याचा अहवालाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. यामध्ये ५७० प्रस्ताव पैकी सातारा जिल्ह्यामधून सामाजिक कार्यकर्ते साहिल सलीम काझी यांचे सामाजिक कार्य पाहून त्यांना यंदाच्या वर्षीचा समाजभूषण पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले.
यावेळीस आशिर्वाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि राज्यभरातून विविध ठिकाणाहून समाज्यामध्ये कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुरस्कारामुळे भविष्यात सामाजिक क्षेत्रात अजून जोमाने काम करण्याची ऊर्जा भेटेल आणि उत्साह देखील, हे निश्चित असे काझी यांनी सांगितले. या कार्यक्रमास मा. आमदार राजीव आवळे (हातकलणगणे) तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. जगदीश ओहोळ पुणे, अमन पटेल भारत प्रतिनिधी युनायटेड नेशन तुर्की परिषद हे उपस्थित होते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद बल्लाळ हे देखील उपस्थित होते.