प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांचा अनोखा उपक्रम नेत्र तपासणी शिबिरात १२५ जणांची तपासणी
भोर – प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान आणि डॉ. दुधभाते नेत्रालय व रेटीना सेंटर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर सोमवारी (दि.२१) आर टी ओ कॅम्प कार्यालय भोर येथे घेण्यात आले. सदरच्या शिबीरात नागरिकांना दुचाकी,चार चाकी, मोटार ड्रायव्हिंग टेस्ट नवीन लायसन्स,जुने लायसन्स चाचपणी , नुतनीकरण, दुचाकी मोटरसायकल चाचणी, चार चाकी कार, मालवाहतूक गाड्या तसेच जुन्या वाहनांचे पासिंग करणे अशा अनेक प्रकारची कामे या रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात करण्यात आलीत.
सदरच्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांच्या पुणे येथील बैठकीच्या अनुषंगाने रस्ता सुरक्षा विषयी माहिती मार्गदर्शन केले. दुचाकी, मोटर सायकल स्वारांना हेल्मेट वापरावे,वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नये ,वाहनांचे , वाहतूकीचे नियम पाळावे. आजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या, स्पर्धेच्या युगात हेल्मेट न वापरल्याने अनेकांना अपघातात आपले प्राण गमवावे लागले, अपंगत्व पत्कराले. सक्तीशिवाय स्वसंरक्षणासाठी वाहने चालवताना हेल्मेटचा वापर नागरिकांनी करावा व हेल्मेट ही दुचाकी वाहनस्वाराची गरज आहे. तसेच कोणतेही मोठे छोटे चारचाकी वाहन चालविताना नेहमी सिटबेल्टचा वापर करावा, दारू अथवा कोणतेही मादक नशेले पदार्थ खाऊन गाडी चालु नये , सध्याच्या गर्दीत वाहतूक कोंडीसारख्या समस्येवर नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी हा एकमेव उपाय आहे असे यावेळी परिवहन अधिकारी यांनी सोप्या भाषेत सांगितल्या .
यावेळी पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मोटर वाहन निरीक्षक संतोष झगडे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नेहा कांबळे ,सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सुप्रिया घाडगे , गुजर मोटार ड्रायव्हिंग स्कूल, गावडे मोटर ड्रायव्हिंग स्कूल , बांदल मोटर ड्रायव्हिंग स्कूल,शिळीमकर मोटर ड्रायव्हिंग स्कूल, बडदे मोटर ड्रायव्हिंग स्कूल, प्रमोद गुजर, निलेश सावंतसह इतर प्रतिनिधींनी सहभाग घेतला .
तसेच यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे,डॉ. दूधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिरही घेण्यात आले. त्यामध्ये एकूण १२५ नागरिकांची डोळे तपासणी करण्यात आली.