भोरः लग्न झाल्यानंतर प्रापंचिक कारणावरुन सासरच्यांकडून सुनेचा मानसिक व शारिरीक छळ करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका २५ वर्षीय महिलेने (वेळु फाटा ता. भोर जि. पुणे) राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूनेला सासरे नुर मह्हमद शेख, सासू फरीदा नुर मुह्हमद शेख, दीर समीर नुर मह्हमद शेख व नवरा अमीर नुर मुह्हमद शेख हे वांरवार प्रापंचिक कारणावरुन त्रास देत होते. दि. १.११.२०१५ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घरगुती कामे करता येत नाहीत म्हणून सर्वांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन दमदाटी केली. झालेला संपूर्ण प्रकार फिर्यादी यांनी माहेरच्यांना सांगितला असता, माहेरच्यांनी फिर्यादी यांना नांदायला सांगितले. त्यानंतर फिर्यादी या पुन्हा नांदायला गेल्या. परंतु, त्यांनंतर पुन्हा सासरच्यांकडून त्यांंचा मानसिक व शारिरीक छळ होऊ लागला. वडिलांकडून पैसे घेऊन ये असे बोलले जावू लागले. तसेच ननंद अल्फिया तौसिफ शेख रा. वाई ता. खंडाळा जि. सातारा यांनी फिर्यादी यांना धमकी दिली. असा आरोप फिर्यादी यांना केला आहे.
सासरच्यांकडून फिर्यादीची पिळवणूक करीत अनेक गोष्टींचा तगादा
थोड्या दिवसांनी सासरच्या लोकांनी माहेराहून प्रिंटींगची मशिन घेण्यासाठी वडिलांकडून दोन लाख रूपये पैसे घेवुन व वडिलांच्या नावावर असलेले मुंबई येथील घर पतीच्या नावावर करण्याचा तगादा लावला होता. या कारणावरुन शिवीगाळ, मारहाण आणि शारिरीक त्रास देऊन उपाशी पोटी ठेवू लागले होते. या सगळ्या प्रकाराला कंटाळून फिर्यादी यांनी पोलीस ठाणे गाठत सासरच्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक सुर्यवंशी हे करीत आहेत.