Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पुणे जिल्हा तालीम संघाच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धा नसरापूर येथे ८ व ९ मार्च रोजी

by SBPRNL
March 4, 2025
पुणे जिल्हा तालीम संघाच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धा नसरापूर येथे ८ व ९ मार्च रोजी

नसरापूर: कर्जत-जामखेड येथे होणाऱ्या ६६ व्या राज्य अजिंक्यपद आणि प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पुणे जिल्हा संघाच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचे आयोजन नसरापूर येथे करण्यात आले आहे. पुणे जिल्हा तालीम संघाच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या संलग्नतेने ही स्पर्धा ८ आणि ९ मार्च रोजी पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी दत्तामामा भरणे,क्रीडामंत्री व मकरंद पाटील,पुनर्वसनमंत्री तसेच सुनेत्रवहिनी पवार ,खासदार यांची उपस्थिती असणार आहे.

या  स्पर्धेची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, पुणे जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. अमोल बुचडे,पै.स्वप्नील कोंडे , अभिषेक खोपडे, राजेंद्र सोनवणे, प्रशांत दाणवले, लालू आप्पा कोंडे तेजस पायगुडे, पै शंभू कोंडे ,शशिकांत शिंदे उपस्थित होते.

You might also like

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

‘त्या’ चोरी करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला बेड्या; राजगड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नसरापूरः एका रात्रीत चोरट्यांनी मारला चार दुकानांवर डल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद, नागरिकांत भीतीचे वातावरण

ही निवड चाचणी स्पर्धा वरिष्ठ व कुमार अशा दोन गटांत पार पडणार असून, एकूण ३० वजन गटांमध्ये कुस्तीगीर आपले नशीब आजमावतील. वरिष्ठ गटात मॅट आणि माती अशा दोन्ही प्रकारांत प्रत्येकी १० गट आहेत. विशेषतः महाराष्ट्र केसरी गटातील स्पर्धा ८६ किलोपासून १२५ किलो वजन गटांमध्ये होणार आहे. कुमार गटात ४१ ते ११० किलो या वजन गटांमध्ये कुस्ती लढती रंगतील.

स्पर्धेतील विजेत्यांना विशेष बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रत्येक वजन गटातील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या पैलवानाला सायकल, प्रशस्तीपत्रक आणि ट्रॉफी प्रदान केली जाईल, तर उपविजेत्याला प्रशस्तीपत्रक आणि ट्रॉफी दिली जाईल.

स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्र केसरी गटातील अंतिम माती आणि मॅट कुस्तीतील विजयत्यामधील अंतिम लढत. या स्पर्धेतील विजेत्याला पै. विक्रम पारखी यांच्या स्मरणार्थ “चांदीची गदा” आणि “पुणे जिल्हा केसरी” किताब देण्यात येणार आहे. तसेच, कुमार गटाच्या ११० किलो गटातील अंतिम विजेत्यास स्व. पै. अक्षय कोंडे यांच्या स्मरणार्थ “चांदीची गदा” आणि “पुणे जिल्हा कुमार केसरी” किताब प्रदान केला जाणार आहे.

स्वप्नील कोंडे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आमदार शंकरभाऊ मांडेकर आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भालचंद्रभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडेल. अध्यक्षपदाची जबाबदारी पै. अमोल बुचवडे सांभाळणार आहेत.

या निवड चाचणीतून विजयी ठरलेले पैलवान कर्जत-जामखेड येथे महाराष्ट्र केसरी किताबासाठी स्पर्धेत उतरतील. त्यामुळे कुस्तीप्रेमींसाठी ही स्पर्धा अत्यंत महत्वाची आणि रोमांचक ठरणार आहे.

Tags: Kustinasarapur
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
‘त्या’ चोरी करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला बेड्या; राजगड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
क्राईम

‘त्या’ चोरी करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला बेड्या; राजगड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

December 14, 2024
नसरापूरः एका रात्रीत चोरट्यांनी मारला चार दुकानांवर डल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद, नागरिकांत भीतीचे वातावरण
ताज्या बातम्या

नसरापूरः एका रात्रीत चोरट्यांनी मारला चार दुकानांवर डल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद, नागरिकांत भीतीचे वातावरण

December 6, 2024
नसरापूरः अन्यथा महावितरण कार्यालयाला टाळे ठोकू……! काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या इशाऱ्यानंतर अधिकारी खडबडून जागे; आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित
ताज्या बातम्या

नसरापूरः अन्यथा महावितरण कार्यालयाला टाळे ठोकू……! काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या इशाऱ्यानंतर अधिकारी खडबडून जागे; आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित

October 14, 2024
पोलीस असल्याची बतावणीः ८५ हजार किंमतीचा सोन्याचा ऐवज केला लंपास; शिरवळच्या शिंदेवाडी फाट्यावरील घटना
क्राईम

नसरापूरः तुम्ही १०० रुपयाच्या नोटेला सोन्याचा स्पर्श करा, तुमच्या दुकानामध्ये लक्ष्मी येईल; थाप मारून अर्धा तोळा वजनाची सोन्याची अंगठी केली लंपास

September 25, 2024
दिव्यांगनिधी वाटप प्रकरण: तक्रारदारच चौकशीच्या फेऱ्यात; ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांची दांडी
ताज्या बातम्या

दिव्यांगनिधी वाटप प्रकरण: तक्रारदारच चौकशीच्या फेऱ्यात; ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांची दांडी

August 7, 2024
Next Post
शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी होणार दूर; जोगवडी येथे पाणंद रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न

शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी होणार दूर; जोगवडी येथे पाणंद रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group