कोंढवाः वानवडी भागात सहा वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आता कोंढव्यातील बोपदेव घाट परिसरात एका २१ वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, काल रात्री बोपदेव घाट परिसरात 21 वर्षीय तरुणी मैत्रिणीसोबत फिरायला गेली होती. त्या ठिकाणी रात्री अकराच्या सुमारास तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनतर गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची पथके आरोपींच्या मागावर रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सातत्याने घडणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्याचार, विनयभंगाच्या घटना कमी होत नसल्याने महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना तयार झाली आहे.
रंजन कुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त पुणे यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे ती पुढीलप्रमाणे काल रात्री २१ वर्षीय मुलगी आपल्या मित्रांसोबत बोपदेव घाटात गेली होती. त्या ठिकाणी बसून पीडित तरुणी आणि तिच्यासोबत असलेले मित्र गप्पा मारत बसले होते. रात्री अकरा वाजण्यास सुमारास त्या ठिकाणी ३ अनोळखी लोकं त्या ठिकाणी आले. त्यांनी पीडितेसोबत असलेल्या मुलाला मारहाण केली. तरुणीवर अतिप्रसंग केला. या घटनेनंतर मुलाने त्याच्या नातेवाईकांना या घटनेबाबत माहिती दिलेली आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना शुक्रवारी पहाटे ५ मिळाली. यासाठी एकूण १० पथके रवाना करण्यात आलेली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या घटनेतील ३ मुलांचा शोध सुरु आहे. बोपदेव घाटात नेहमीप्रमाणे लोक मार्निंग वॉकला जात असताना मारहाण करत मित्राला बाधूंन ठेवले. होते. या घटनेतील पीडित तरुणी गंभीर जखमी आहे, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी पुर्णपणे निष्पन्न झालेले नाहीत.