Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

जनजागृतीः जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कूल, ज्युनिअर कॅालेजच्या विद्यार्थ्यांनी केले नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

रॅली काढून सांगितले मतदानाचे महत्व, पोस्टर हातात धरून विद्यार्थ्यांनी केली जनजागृती, सर्वांकडून कौतुक

by SBPRNL
October 8, 2024
जनजागृतीः जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कूल, ज्युनिअर कॅालेजच्या विद्यार्थ्यांनी केले नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

भोरः काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्षम आणि सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करणे महत्वाचे असल्याचा संदेश देत रॅली काढून, नागरिकांच्या घरोघरी जाऊन तसेच व्यावसायिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. राजगड ज्ञानपीठ संचलित जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीने येथे आठवडी बाजाराच्या निमित्ताने नवभारत साक्षरता अभियान रॅली आणि मतदान जनजागृती  उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

यावेळी डॉ. विकास खरात निवडणूक निर्णय अधिकारी भोर विधानसभा मतदार संघ भोर तथा उपविभागीय अधिकारी भोर, राजेंद्र नजन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भोर विधानसभा मतदार संघ भोर तथा तहसिलदार भोर, आदेश दूनखे निवडणूक नायब तहसीलदार, भोर, योगेश सरोदे महसूल सहाय्यक हे सर्व मान्यवर विशेष उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि प्राचार्य यांच्यासमवेत राजगड ज्ञानपीठ संस्थेचे विशेष कौतुक व अभिनंदन केले.

राज्य निवडणूक आयोगाकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या जात असून, विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यालाच अनुसरून विद्यार्थ्यांनी मतदान जागृतीचे फलक झळकावत आणि शासन आदेशानुसार नवभारत साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत रॅली काढून मतदान करण्याचे नागरिकांना आवाहन केले. राजगड ज्ञानपीठ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतराव थोपटे, कार्याध्यक्ष संग्राम थोपटे आणि मानद सचिवा स्वरूपा थोपटे यांनी सर्वांचे कौतुक केले व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले.

देश हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा संविधानिक हक्क बजावला पाहिजे, असे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी हातात सूचना फलक घेऊन “साक्षर व्हा !”आणि ‘मतदान करा’ अशा घोषणा दिल्या. बँड पथकाच्या आवाजाने व मतदान करा या घोषणांनी परिसर दणाणून सोडला गेला. या जनजागृतीच्या अभियानात शालेय तसेच कनिष्ठ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनसोबत प्राचार्य रुबिना सय्यद, प्राचार्य स्वाती मोटकर आणि सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थी स्काऊट व शालेय गणवेशात उपस्थित होते.

घटनेने देशाच्या नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून, आपण ते बजाविलेच पाहिजे, या विचाराचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

प्राचार्य रुबिना सय्यद 

Tags: Bhorrajgadcollegerajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
भोरः राजगड सहकारी साखर कारखाना ‘या’ वर्षी देखील  सुरू होणार असल्याची श्वास्वती नाहीः रणजित शिवतरे; …..म्हणून महायुतीचा उमेदवार विधानसभेवर असायला हवा

भोरः राजगड सहकारी साखर कारखाना 'या' वर्षी देखील सुरू होणार असल्याची श्वास्वती नाहीः रणजित शिवतरे; .....म्हणून महायुतीचा उमेदवार विधानसभेवर असायला हवा

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group