Tuesday, June 16, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पारगांवः ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू, चौफुला-केडगाव महामार्गावरील अपघात

मुरमाच्या ढिगाऱ्यामुळे तरुणाला जीवाला मुकावे लागले

by SBPRNL
August 25, 2024

पारगांव: धनाजी ताकवणे
चौफुला-केडगाव महामार्गावर गुरुवारी (दि. २२) रात्री ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे एका दुचाकीस्वार युवकाला जीव गमवावा लागला असल्याची घटना घडली आहे. हा अपघात रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. नितीन गोपाल पटेल (वय ३७ रा. चौफुला ता. दौंड) असे अपघातात ठार झालेल्या चौफुला येथील व्यापाऱ्याचे नाव आहे. ते गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास केडगावकडून चौफुल्याकडे येत होते. यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात टाकलेल्या मुरमाच्या ढिगाऱ्याला दुचाकी धडकून पटेल सिमेंट रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला.

सध्या चौफुला केडगाव रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. अपघात झालेल्या ठिकाणी दोन्ही लेनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चौफुला लेनवर वाहतूक सुरू आहे. तर केडगावकडे जाणाऱ्या लेनवर ठेकेदाराने मुरमाचे ढिगारे टाकले आहेत. आठवडा झाला तरी हे ढिगारे रस्त्यात पडून आहेत. या काळात ढिगाऱ्यांना धडकून पाच दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. ढिगाऱ्यांजवळ कुठलेही परावर्तक किंवा फलक लावलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्यावेळी समोरून जास्त उजेडाचे वाहन आल्यास दुचाकीस्वारांना हे ढिगारे दिसत नाहीत. त्यात सध्या पावसाचे वातावरण असल्याने हे मळकट ढिगारे दिसून येत नाहीत. स्थानिकांनी गेल्या आठ दिवसांपासून ठेकेदाराच्या अधिकाऱ्यांना ढिगारे हटविण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी याबाबत काहीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे नितीन पटेल यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

You might also like

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Tags: accidentchufulakedgaonrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Next Post
वीर: श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात देवाला सोन्याचा गाभारा अर्पण, मंदिरात भक्तिमय वातावरणात कार्यक्रम संपन्न

वीर: श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात देवाला सोन्याचा गाभारा अर्पण, मंदिरात भक्तिमय वातावरणात कार्यक्रम संपन्न

ताज्या बातम्या

मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

June 15, 2026
“ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा नातवाकडून निर्घृण अंत!”

“ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा नातवाकडून निर्घृण अंत!”

June 15, 2026
नव्या पोलिस निरीक्षकांचा कडक इशारा; कायदा मोडाल तर कारवाई होणारच!

नव्या पोलिस निरीक्षकांचा कडक इशारा; कायदा मोडाल तर कारवाई होणारच!

June 15, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group