सासवड: प्रतिनिधी खंडू जाधव
श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट, वीर यांच्यामार्फत समस्त भक्त-भाविक, सालकरी, मानकरी, देणगीदार, ग्रामस्थ, विश्वस्त व सल्लागार यांच्या प्रमुख उपस्थितीतमध्ये श्रावणी रविवारचे औचित्य साधत देवाला सोन्याचा गांभारा, सुवर्ण चौकट, चांदीची प्रभावळ अर्पण करण्यात आली. यावेळी विधिवत भैरवयाग यज्ञांचा कार्यक्रम मोठ्या भक्तीमय व उत्साही वातावरणात पार पडला.
सकाळी सहा वाजता मंदिरात विधिवत भैरवयाग यज्ञ, त्यानंतर अभिषेक करण्यात आला. सकाळी ११ वाजता अपर्ण सोहळा व त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याचे देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष धुमाळ यांनी सांगितले. मागील वर्षी देवाच्या संपूर्ण गाभाऱ्याचे सुवर्णमखरात रुपांतर करण्याचा ध्यास घेत गावातील प्रतिष्ठीत मंडळींच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान ट्रस्टने सर्व भाविकांचे सहकार्य घेत देणगीच्या माध्यमातून देवाला सोने, चांदी व देणगी देत सदर काम पूर्णत्वाला नेण्यास खूप सहकार्य केल्याचे देवस्थान ट्रस्टचे खजिनदार अमोल धुमाळ यांनी सांगितले. तसेच या कार्यासाठी देणगीदार सर्व भाविक भक्त, देणगीदार, ग्रामस्थ यांच्या सहकार्य लाभल्याच्या सांगण्यात आले. अर्पण सोहळा होत असल्याने सर्वांची इच्छा पूर्ण होत असून यापुढे अधिक काम करण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे मा. विश्वस्त दिलीप धुमाळ व मित्रपरिवार यांच्या विशेष मार्गदर्शन लाभले, असे सचिव अभिजित धुमाळ यांनी सांगितले.
५ तोळे देवाला अर्पण
कामाची व्याप्ती पाहता देवाच्या पुढील कामासाठी तात्यासाहेब काळे, अण्णासाहेब काळे थेऊर यांनी ५ तोळे सोने देवाला अर्पण केले. भंडारा धारक प्रमोद गरुड, अरुण राजीवडे, जालीन्धर पवार, रुक्मिणी बनकर, संजय बधे, अविनाश बडदे व श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान वीर यांनी अन्नदान केले. सदर कार्यात ट्रस्टचे विश्वस्त हनुमंत धुमाळ, संजय कापरे, नामदेव जाधव, राजेंद्र कुरपड दत्तात्रय समगिर, तसेच सल्लागार मंडळ, प्रतिष्ठित ग्रामस्थ, सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, ग्रामस्थ सर्व भाविक भक्त यांनी सर्व व्यवस्था पहिली.