सासवडः प्रतिनिधी खंडू जाधव
सध्या पावसाचे वातावरण असल्याने अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना अधून मधून घडतच असतात. अशा दुर्घटनांमध्ये अनेकांनी आपला जीव गमवल्याचे देखील सांगण्यात येते. तशा प्रकारच्या बातम्या आपण वर्तमान पत्रामधून किंवा मग टीव्हीवर बघतच असतो. ईर्शालवाडी गावात डोंगरचा एक कडा कोसळला आणि अख्य गाव जमीनदोस्त झालं होतं. अनेकांचे संस्कार उघड्यावर आले. प्रशासनाने गावाचे पुर्नवसन केल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. पुरंदर किल्ल्याच्या पूर्व दिशेला गावात दरड कोसळण्याची घटना घडली असून, सुदैवाने या घटनेत कोणतीही मनुष्य किंवा प्राणी हानी झालेली नाही. मात्र, अशा घटनांवर प्रशासनाने योग्य ती पावले उचलण्याची मागणी येथील रहिवावासी वर्गाकडून करण्यात येत आहे.
मोठा आवाज झाला. आवाजाच्या दिशेने गेलो असता दरड कोसळली होतीः प्रत्यक्षदर्शी
पुरंदर किल्ल्याच्या पूर्व दिशेला असलेल्या पायथ्याला लागून पानवडी आणि पांगारे हे दोन गावं आहेत. चारही बाजूंनी डोंगर आणि द्रोणीय स्थितीमध्ये असणाऱ्या जागेत रुद्र गंगेच्या काठावर अगदी निपळीच्या जागेवर गावची वस्ती आहे . कितीही पाऊस झाला तरी पाणी वाहून जाते आणि तसा पाण्याचा मुळीच धोका नाही. मात्र गावच्या उत्तरेला दुर्गुडी या नावाने एक दीडशे मीटर उंचीचा कडा आहे. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता मोठे मोठे दगड कोसळल्याचा आवाज येथील नागरिकांना स्पष्टपणे ऐकू आला. त्या आवाजाच्या दिशेने येऊन डोंगराकडे पाहिले असता दरड कोसळली असल्याचे एका प्रत्यक्षदर्शिला दिसले.
सुदैवाने जीवीत हानी नाही.
सुदैवाने कोणतीही जनावरे त्या ठिकाणी नव्हती किंवा मनुष्य प्राण्याला किंवा वित्ताची हानी झाली नाही. पण या घटनेत दोन लिंबाची झाडे व काही झुडपे जमीनदोस्त झाली आहेत. ज्या ठिकाणी दरड कोसळली त्याला लागून असणारी त्याहून कितीतरी मोठी दरड अगदी कोसळण्याच्या मार्गावर आहे, ती केव्हाही कोसळू शकते. यामुळे याबातचे सर्व वृत्तांत तहसीलदार पुरंदर, सर्कल अधिकारी शिवरी व वृत्त पत्र प्रतिनिधींसाठी पाठवले आहे, प्रशासनाने याबाबतीतत योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. तसेच ग्रामस्थांनी सुद्धा दक्षता घेणे गरजेचे आहे.