Wednesday, June 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

मांढरदेवीच्या दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सारोळ्यानजिक झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

by SBPRNL
November 29, 2024
मांढरदेवीच्या दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सारोळ्यानजिक झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

सारोळे:  सातारा-पुणे महामार्गावर मांढरदेवीला दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबातील एका व्यक्तीचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघाताची घटना शुक्रवार दि. २९ नोव्हेंबर रोजी सव्वा अकराच्या सुमारास सातारा-पुणे महामार्गावरील सारोळेनजिक घडली आहे. या घटनेत उत्तम झेंडे (वय अंदाजे ५५ वर्ष, रा. वडकी, ता. हवेली) असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कुटुंबातील व्यक्तीच्या अशा अपघाती जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झेंडे कुटुंबीय मांढरदेवीच्या दर्शनासाठी २ गाड्यांसह वाई रस्त्याने निघालेले होते. पुणे-सातारा महामार्गावर सारोळे गावच्या हद्दीतील हॅाटेल मल्हार समोर त्यातील एका गाडीचा टायर पंक्चर झाला. यावेळी मृत उत्तम झेंडे हे दुसऱ्या गाडीतून पुढे निघून गेले होते. टायर पंक्चर झाल्याचा फोन त्यांना आला. त्यानंतर ते गाडीसह त्या दिशेने निघाले. रस्ता ओलांडत असताना पलीकडे असलेल्या साताराकडून पुण्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की या दुर्घटनेत झेंडे यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस, महामार्ग पोलीस व आर. टी. ओ. अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. राजगड पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी भोर उपविभागीय रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.

Tags: accidentnewsBhorpunesatarahighwayrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
भोरः जु्न्या पुलाखाली आढळला ८४ वर्षांच्या व्यक्तीचा मृतदेह; मयत व्यक्ती ‘प्रोस्टेस्ट’ आजाराने ग्रस्त असल्याची माहिती

भोरः जु्न्या पुलाखाली आढळला ८४ वर्षांच्या व्यक्तीचा मृतदेह; मयत व्यक्ती 'प्रोस्टेस्ट' आजाराने ग्रस्त असल्याची माहिती

ताज्या बातम्या

महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

June 17, 2026
जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

June 16, 2026
मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

June 15, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group