भोरः भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यातील गावात विविध विकास कामांच्या उद्घाटनच्या अनुषंगाने भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या गाव भेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून या दौऱ्याला सुरुवात झाली असून, वेल्हा तालुक्यातील गावापासून या दौऱ्याचा शुभारंभ झाला आहे. आमदार थोपटे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या क्षेत्रात येणाऱ्या गावातील विविध विकास कामांना मंजूरी मिळाली आहे. पुढील १५ दिवस हा गावभेट दौरा चालणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
यात प्रामुख्याने रस्ता, पेव्हिंग ब्लॅाग, रस्त्याचे रुंदीकरण, रुग्णवाहिका देणे, सभागृह बांधणे, ग्रामंपयात कार्यालय आदी कामांना मंजूरी देण्यात आली आहे. या विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटनाचे कार्यक्रम विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. या गावभेट दौऱ्यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आ. थोपटे यांच्या वतीने करण्यात आले आहे.