भोरः महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांनी प्रचारार्थ कंबर कसली असून, तालुक्यातील विविध भागांतील गावांना भेट देत नागरिकांशी ते संवाद साधत आहेत. त्यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने येथे युतीच्या वतीने पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये युतीमधील सर्व घटक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मांडेकर यांना सर्वांचा पाठिंबा मिळत असून, निवडणुकीतील विजय हा महायुतीचा असेल, असा ठाम विश्वास भाजपचे जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे यांनी व्यक्त केला. युतीमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या विधानसभा क्षेत्रातील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याची आवाहन यावेळी त्यांनी केले.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (महायुतीचे) उमेदवार शंकर मांडेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, नारायण स्वामी, श्रीकांत कदम आरपीआय अध्यक्ष, आमदार ढमाले, बाळासो गरूड उपाध्यक्ष, वैशाली सणस सरचिटणीस, राजाभाऊ वाघ, जीवन कोंडे, राजू रेणुसे, आण्णा देशमाने, नानासाहेब साबणे आदी युतीमधील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भोर विधानसभा मतदार संघ हा कित्येक वर्ष काँग्रेसकडे आहे, पण या मतदार संघाचा विकास झाला का? असा सवाल वासुदेव काळे उपस्थित केला. इथला बराच भाग हा दुर्गम असून, अनेक ठिकाणी सोय सुविधांचा अभाव आहे. युतीचा उमेदवाराला संधी दिल्यास विकासाचा अनुशेष भरुन काढला जाईल, असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला.
…म्हणून इकडं तिकडं बघण्याची गरज नाही.
युतीच्या उमेदवारासाठी वेगळ वातावरण तयार झाले आहे. शंकर मांडेकर हे महायुतीचे उमेदवार आहेत. भाजपचे केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयाचे पालन आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे राज्यातील नेते करीत आहेत. जी जबाबदारी युतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मिळेल, त्याची पालन करणे ही नैतिक जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची पार पाडावी, असे देखील काळे यांनी सांगितले. विशेष म्हणजे शंकर मांडेकर यांचा अनुक्रमांक हा १ आहे, त्यामुळे इकडं तिकडं बघायची गरज नाही.
भोर विधानसभेच्या तळागळातील मतदारांपर्यंत पोहचणे अवघड नाही. याचे कारण म्हणजे युतीमधील सर्वजण एकत्रित आहेत आणि ते एकदिलाने काम करणार आहेत, त्यामुळे या भागातील मतदारांपर्यंत पोहचणे अवघड नाही.
शंकर मांडेकर (महायुतीचे उमेदवार ,भोर विधानसभा)