भोर, दि. २६: देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या शौर्यवान जवान कालिदास तानाजी भालेघरे यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. ते बीएसएफ मध्ये २००६ पासून कार्यरत होते आणि देशासाठी आपले प्राण अर्पण केले.
शिंद (नानाचीवाडी) ता. भोर येथील रहिवासी असलेले कालिदास भालेघरे यांनी आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत देशाच्या विविध भागांमध्ये सेवा दिली. कश्मीर, दिल्ली, आसाम, साऊथ बंगाल, त्रिपूरा आणि जम्मू या ठिकाणी त्यांनी देशाची सेवा केली.
२०२३ मध्ये त्यांची बदली १४८ वी वाहिनी सीसुबल पलौरा कैम्प जम्मू (कश्मीर) मध्ये झाली होती. ते सध्या याच वाहिनीमध्ये कार्यरत होते.
कालिदास भालेघरे यांचा पार्थिवदेह उद्या दि. २७ रोजी त्यांच्या मूळ गावी शिंद येथे आणला जाणार आहे. त्यांच्यावर शासकीय इत्मात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
कालिदास भालेघरे यांच्या निधनाने संपूर्ण परिसर शोककळा पसरला आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती संपूर्ण भोर तालुक्याचे शोक व्यक्त होत आहे. देशाच्या सेवेत शहीद झालेल्या या वीर जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली.