Monday, June 8, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

काळाचा घालाः राजणे गावच्या हद्दीत रिक्षाचा अपघात; मायलेकाचा जागीच मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

घटनेची माहिती मिळताच रेस्कू टीम घटनास्थळी दाखल, रिक्षावर पडलेले झाड काढले बाजूला, प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन

by Team Rajgad Publication
October 15, 2024
काळाचा घालाः राजणे गावच्या हद्दीत रिक्षाचा अपघात; मायलेकाचा जागीच मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

राजगडः येथील रांजणे गावच्या हद्दीत रिक्षाच्या झालेल्या अपघातामध्ये मायलेकाचा दुर्देवी मृत्यू झाला असून, विवाहित मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये शालन पासलकर (वय ६५), दिपक पासलकर (वय ४५) मुळगाव गिवशी (ता. राजगड) सध्या राहणार दौंड जि. पुणे यांचा मृत्यू झाला आहे. तर कविता मरळ (वय ४०) राहणार कानंद (ता.राजगड) या गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कानंद गावचे पोलीस पाटील संजय कडू यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आई शालन व मुलगा दीपक हे कानंद येथे मुलीकडे गेले होते. तेथून पाबे घाट मार्गे पुण्याकडे जात असताना रांजणे गावच्या हद्दीत हा दुर्देवी अपघात घडला. या अपघाताची माहिती खानापूर येथील डॉ. स्वागत रिंडे यांनी आपत्ती व्यवस्थापनाला दिल्यानंतर रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी रिक्षावर पडलेले झाड कापून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला. आपत्ती व्यवस्थापन टीममधील सदस्य तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संदीप सोळसकर, संजय चोरघे, नीलकंठ लोहकरे, व कैलास दारवटकर यांनी रस्त्यावर पडलेले झाड बाजूला केले.

सावधान…! प्रवास करताना काळजी घ्या!

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झालेल्या परिसरामध्ये जोरदार पाऊस पडल्याने रस्त्यामध्ये मोठे झाड पडले होते. पडलेल्या झाडाच्या अलीकडेच रांजणे गावच्या हद्दीत असलेल्या छोट्याशा पुलाच्या कठड्याला रिक्षा धडकून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सध्या कधी उन्ह तर कधी अचानक पाऊस कोसळत आहे. यामुळे या भागातून प्रवास करताना पाऊस आहे का याची चाचपणी करुनच प्रवास करावा असे सांगितले जात आहे. सदर ठिकाणी घाट असल्याने रात्रीच्या सुमारास प्रवास करताना पाऊस वारे वादळ आदींमुळे चालकाला याचा अंदाज येत नाही. यामुळे प्रवास करताना काळजी घ्या असे आवाहन केले जात आहे.

Tags: accidentnewsBhorrajgadnews
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

पिरंगुटः पत्रकार असल्याची बतावणी करीत किराणा व्यावसायिकाला केली खंडणीची मागणी; पोलिसांनी चार जणांना ठोकल्या बेड्या

ताज्या बातम्या

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group