श्री छत्रपती शाहू अर्बन को. अॅाप बँकेत प्रक्षिणार्थी कनिष्ठ अधिकरी पदाची एकूण ४६ जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीची नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवाराचे वय २५ ते ३० असावे. राज्यातील कोणत्याही भागातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतो. ही पदे कायस्वरुपी असून, या भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार असून, दि. ७ ते दि. २१ अॅागस्ट या कालावधीमध्ये उमेदवार अॅानलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात.
या भरतीसाठी उमेदवार फ्रेशर किंवा अनुभवी दोन्ही पात्र आहेत. अर्ज हा इमेलद्वारे करावा लागणार आहे. या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेची फी ११८० रुपये आकारण्यात आलेली आहे. तसेच या भरतीसाठी उमेदवाराकडे विद्यापीठाची पदवी, एमएससीआयटी कोर्स, बँक पतसंस्थेचा कामाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. एमबीए, एमकॅाम फॅायनान्स या उमेदवारांना प्राधान्य असेल. उमेदवारांनी त्यांचा सीव्ही pbarecruitSCRSUCB@gmail जाहिरात प्रसिध्दिच्या १५ दिवसांच्या आत करावा. तसेच अर्जासोबत परीक्षा फीची पावती असणे अनिवार्य आहे. अर्जासोबत परीक्षा फीची पावती पाठवणाऱ्यांचा लेखी परीक्षेसाठी विचार केला जाणार आहे. लेखी परीक्षा अॅाफलाईन पद्धतीने असून, बीड येथे घेण्यात येणार आहे. याबातचे ठिकाण, वेळ, दिनांक संबधित उमेदवाराच्या मेलवर कळविण्यात येईल. अर्जाचा नमुना punebankasso.com येथे उपलब्ध आहे. एनएफटीने फी भरावी त्याची पावती अर्जासोबत असावी. तसेच नातेवाइकांच्या खात्यावर फी भरल्यास त्याचे तपशील असणे अनिर्वाय आहे.