Sunday, June 28, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

जेजुरीः पोलीस गुन्ह्यातील एका दुचाकीचा शोध घ्यायला गेले अन् मिळाल्या आणखी तीन दुचाकी

जेजुरी पोलिसांची कारवाई, चोरीला गेलेल्या वाहनांचा लावला छडा, तीन आरोपींना ठोकल्या बेड्या

by SBPRNL
August 6, 2024
जेजुरीः पोलीस गुन्ह्यातील एका दुचाकीचा शोध घ्यायला गेले अन् मिळाल्या आणखी तीन दुचाकी

जेजुरीः येथील साकुर्डे गावाच्या हद्दीत असणाऱ्या ‘रॅायल शेतकरी’ या हॅाटेलच्या पार्किंगमधून जूलै महिन्यात होंडा कंपनीची शाईन ही दुचाकी चोरीला गेली होती. या प्रकरणी विकी भिमराव गाडेकर (रा. चोपडच, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असता, चोरीस गेलेले वाहन निरा व लोणंद या भागात विना नंबरने अज्ञात व्यक्ती फिरवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार लोणंद पोलीस आणि बिबेवाडी पोलीस स्टेशनच्या मदतीने संबधित गुन्ह्यातील रिकार्डवरील गुन्हेगारांची माहिती मागविण्यात आली. या माहितीत आरोपी ओम प्रकाश माने (रा. वीर, ता. पुरंदर, जि. पुणे), धीरज संजय गिरे (रा. येळेवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा), रोहीत सदानंद शेळके रा. टोबरेमळा, ता. खंडाळा, जि. सातारा या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांना पोलीसी खाक्या धाकविताच आरोपींनी पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली.

गुन्ह्यातील चोरलेली वाहने त्यांनी लोणंद येथील भाडोत्री रुमच्या बाहेर लावल्याचे पोलिसांना सांगितले. आरोपींनी सांगितलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी संबधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, तिथे आणखी तीन दुचाकी पोलिसांना मिळून आल्या. या दुचाकी आरोपींनी जेजुरी, सासवड आणि लोणंद हद्दीतील ठिकाणाहून चोरून नेण्याचे कारवाईत निषन्न झाले आहे. या कारवाईमुळे एका गाडीच्या शोधात गेलेल्या पोलीसांना आणखी तीन गाड्या मिळून आल्या आहेत. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

You might also like

शिरवळ परिसरातील सहा जणांची टोळी दोन वर्षांसाठी सातारा व पुणे जिल्ह्यातून तडीपार

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

शिरवळ | “खुनाचा बदला खुनाने” घेण्याचा प्रयत्न फसला, सहा संशयितांवर गुन्हा दाखल

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, संजय जाधव अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग, तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिक्षक भोर विभाग यांच्या सुचनेनुसार जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दिपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक इन्सपेक्टर तारडे, पोलीस हवालदार तात्यासाहेब खाडे, दशरथ बनसोडे, विठ्ठल कदम, पोलीस कॅान्स्टेबल शुभम भोसले यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार खाडे हे करीत आहेत.

Tags: crimejejuripolicelonadnirapunegraminsatara
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

शिरवळ परिसरातील सहा जणांची टोळी दोन वर्षांसाठी सातारा व पुणे जिल्ह्यातून तडीपार
क्राईम

शिरवळ परिसरातील सहा जणांची टोळी दोन वर्षांसाठी सातारा व पुणे जिल्ह्यातून तडीपार

September 20, 2025
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
शिरवळ | “खुनाचा बदला खुनाने” घेण्याचा प्रयत्न फसला, सहा संशयितांवर गुन्हा दाखल
क्राईम

शिरवळ | “खुनाचा बदला खुनाने” घेण्याचा प्रयत्न फसला, सहा संशयितांवर गुन्हा दाखल

September 17, 2025
Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?
क्राईम

Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?

August 2, 2025
एक कोटींचा चेक बाउन्स; भोर तालुक्यातील छत्रपती ॲग्रो टेकच्या दोघांना एक वर्ष कारावास व ८५ लाखांचा दंड
क्राईम

एक कोटींचा चेक बाउन्स; भोर तालुक्यातील छत्रपती ॲग्रो टेकच्या दोघांना एक वर्ष कारावास व ८५ लाखांचा दंड

July 19, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
Next Post
सामाजिक कार्याची दखल: डॅा. अण्णाभाऊ साठे युवा प्रेरणा पुरस्कारातील समाजभूषण पुरस्काराने साहिल काझी सन्मानित

सामाजिक कार्याची दखल: डॅा. अण्णाभाऊ साठे युवा प्रेरणा पुरस्कारातील समाजभूषण पुरस्काराने साहिल काझी सन्मानित

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group