सासवडः प्रतिनिधी खंडू जाधव
गुरोळी (तालुका पुरंदर) मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुरोळी येथील विद्यार्थ्यांना शिवशक्ती सामाजिक सेवा ट्रस्टचे उपाध्यक्ष सुहास खेडेकर यांच्या वतीने आयकार्डचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा व त्यांना शिकण्याची आवड निर्माण व्हावी याकरिता शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना संस्थेद्वारे वह्या वाटप करणे, दप्तर देणे अशा अनेक उपक्रमाद्वारे मदत केली जाते. विद्यार्थ्याला त्यांच्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नाही असे घडू नये याकरता संस्थेद्वारे गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी मदत केली जाते. असे जीवन खेडेकर यांनी सांगितले.
यावेळी ग्रामपंचायतचे माजी सरपंच लक्ष्मण शिंगाडे ग्रामपंचायत सदस्य जीवन खेडेकर, जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक राजेंद्र गरुड, संस्थेचे उपाध्यक्ष सुहास खेडेकर, तेजस कांबळे, शिक्षक संतोष कामठे आदी उपस्थित होते.