राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती 1 week ago
“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण… 2 weeks ago
कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार 1 month ago
संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार 1 month ago
भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड 1 month ago
Next
Prev
Home शैक्षणिक

विशेष लेखः आनंददायी पालकत्व काळाची गरज

डॅा. मच्छिंद्र सांळूखे यांचा लेख

by Team Rajgad Publication
August 6, 2024
विशेष लेखः आनंददायी पालकत्व काळाची गरज
0
SHARES
325
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या उज्जवल भविष्यासाठी झटत असतो, धडपडत असतो आणि त्यासाठी अहोरात्र कष्ट देखील करीत असतो. आपल्या प्रयत्नांना यश आलं तर आपण आनंदी होतो. पण जर का अपयश पदरी आलं तर मात्र आपण दुःखी होतो. आपल्याला कळत नाही की, आपण कुठे चूक केलेली आहे. मग त्याच्याबद्दल आपल्याला पश्चाताप होतो. असं का घडतं कारण आपण जे काही प्रयत्न करतो त्याच्यामध्ये अपेक्षा असते, त्याच्यामध्ये सहजता नसते. आनंद नसतो, म्हणून आपल्याला अपेक्षा भंगाच दुःख हे जास्त होत. आज आपण बघणार आहोत एक पालक म्हणून आपल्या पाल्याच्याप्रती आपली काय भूमिका असली पाहिजे . त्याचे संगोपन करताना कोण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. ते या लेखाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न आहे.

पालक-पाल्यांमध्ये सन्मवय असायला हवा

You might also like

भोर: तालुक्यातील शाळांना शिक्षण आयुक्तांची भेट, शाळेत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची घेतली माहिती

भोरः एसटी स्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य; स्थानकात अनेक सुविधांचा अभाव, नागरिक व विद्यार्थ्यांचे होताहेत हाल

बाप समजून घेताना….. विद्यार्थ्यींनीना अश्रू अनावर; वसंत हंकारेंची व्याख्यानमाला, मुले-मुली-पालकांचा उस्फुर्त सहभाग

ज्यावेळेस आपण पालकत्व करतो, त्यावेळी आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतो. त्यावेळेला या पालकत्वामध्ये सहजता हवी, आनंद हवा. आनंदाने जर तुम्ही काही गोष्टी करताल, तर नक्कीच ते मूल खूप चांगल्या प्रकारे आपण वाढवू शकतो. बऱ्याचदा असंही घडतं की, त्याच्यामध्ये काहीतरी अपेक्षा असते की मी ही गोष्ट करत आहे. मला असा काहीतरी रिझल्ट मिळाला पाहिजे, म्हणून आपली अपेक्षा असते. कधीकधी फार बेफिकिरी पाहायला मिळते, की ठीक आहे मुलांकडे फार लक्ष नाही दिलं तरी चालते. तसेही ते लहानाचे मोठे होणार आहेत. कधी-कधी असं पाहायला मिळतं, की दिवस आणि रात्र त्या मुलांना आईचा धाक असतो. आपण ही पॅनिक असतो, बेचैन असतो आणि त्या मुलालाही स्वस्त बसू देत नाही. अशा कोणत्याही प्रकारचा आतताईपणा चुकीचा आहे.

आनंदादायी जीवन जगणे गरजेचे

आपण ज्यावेळेस आपलं मूल वाढवत असतो त्यावेळेला आपण कसं वागलं पाहिजे. योग्य वेळेला योग्य कृती घडली पाहिजे. तसेच योग्य वेळेला त्या मुलाला साथ देणं हे आपलंच कर्तव्य आहे. प्रेमळ वातावरण निर्मिती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हीही आनंदी रहा व मुलालाही आनंदी राहू द्या, बऱ्याचदा मुलांच्या डोक्यावर अपेक्षांची टांगती तलवार असते. मग कुठे परिक्षेत मार्क कमी पडलेत. कुठे एखाद्या स्पर्धेत नंबर नाही मिळाला. तर त्यावेळेला मुलाला स्पर्धेचा आनंद घेणे दूर पण त्या स्पर्धेत नंबर कसा मिळेल याचं टेन्शन, त्या मुलाला पालकांकडून असते. त्यामुळे पालक म्हणून आपली एक भूमिका आहे. आपलं मूल कालपेक्षा आज कसं चांगलं होईल यासाठी तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही अजिबात तुमच्या पाल्याची इतरांशी तुलना करू नका. अपेक्षांचे ओझं त्यावरती ठेवू नका. तुमच्या आयुष्यामधील जगातलं सगळ्यात अनमोल मूल जन्माला आलेलं आहे. एकमेव आहे. अद्वितीय आहे. जगात एवढी लोकसंख्या आहे, पण तुमच्या पाल्यासारख कोणतही मूल नाही. तुम्ही स्वतः सुद्धा एकमेव अद्वितीय आहात. तुमच्यासारखी कोणीच व्यक्ती नाही. त्यामुळे मुलांचे संगोपन करताना आपल्या बाळातले जे चांगले गुण आहेत, ते जन्मजात कलागुण आहेत. ती ताकद अधिकाधिक कशी वाढेल याकडे आई-वडिलांनी लक्ष दिले पाहिजे.

स्वामी विवेकानंदांच्या कथेतून बोध घ्यावा

स्वामी विवेकानंदांची एक कथा तुमच्या सोबत शेअर करायला मला आवडेल. त्या कथेचा सर्व पालकांनी सकारात्मकतेने विचार करावा.
स्वामी विवेकानंदांचे लहानपणीचे नाव नरेंद्र. त्यांचे वडील वकील होते.वडिलांना नेण्यासाठी रोज एक बग्गी यायची. स्वामी विवेकानंदांना ती बग्गी खूप आवडायची. एकदा अशीच सर्व मुलं हॉलमध्ये बसलेली असताना सहजच त्यांचे वडील त्या मुलांना प्रश्न विचारतात. “बाळांनो तुम्हाला मोठे झाल्यानंतर काय व्हायचं आहे? ” “प्रत्येक जण सांगतो, कोणी डॉक्टर, कोणी वकील, अजून वेगवेगळ बरंच काही.”, परंतु स्वामी विवेकानंद मात्र त्यांची पहिल्यापासून उत्सुकता असते, त्या बग्गीच्या कोचवानाची, ते म्हणतात ” मला कोचवान व्हायचं आहे.” मग सगळी मुलं हसायला लागतात. त्या सगळ्या गोष्टी स्वामी विवेकानंदांची आई भुवनेश्वरी बघत असते. त्या विवेकानंदांच बोट धरून आतल्या खोलीत घेऊन जाते. खोलीमध्ये कुरुक्षेत्रावरील गीता सांगणाऱ्या कृष्णाच आणि अर्जुनाच चित्र लावलेलं असतं. चित्राकडे बोट करून भुवनेश्वरी नरेंद्रला सांगते. “बाळ, तुला कोचवान व्हायचं असेल, तर नक्की हो , पण तू श्रीकृष्णासारखा सारखी सारथी हो जो जगाला मार्ग दाखवेल.”आणि खरंच आईच्या या बोलण्यामुळे स्वामी विवेकानंदानी आध्यात्मिक क्षेत्रात मोठं काम केलं. अनेक लोकांचे जीवन रथ योग्य दिशेने कसा न्यायचा यासाठी त्यांनी सर्वांना मार्ग दाखवला.

……..आणि एक दिवस तुम्हाला तुमच्या पाल्याचा अभिमान वाटेल

पालकांनो तुम्हाला कल्पना नसेल, या जगाला मार्ग दाखवणारी एक दिव्यशक्ती, एक प्रचंड शक्ती, तुमच्या सानिध्यात मोठी होत आहे. माँसाहेब जिजाऊंनी शिवरायांना घडविले व शिवरायांनी जनतेचे स्वराज्य घडविले. श्यामची आई हे पुस्तक आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वाचलंही असेल. छोटासा श्याम आईच्या प्रेमामुळेच, आईच्या शिस्तीमुळेच साने गुरुजी बनले आहेत. मला असं वाटतं, की तुमचं मूल या जगामध्ये प्रचंड मोठी कामगिरी करू शकते. तो आत्मविश्वास तुम्ही त्याला देण्याचा प्रयत्न करा, त्याला तुम्ही इतरांसारखे बनवण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यातले जे सुप्त गुण आहेत, त्याच्यातील जी जन्मजात शक्ती आहे. ती अधिक अधिक वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करा. मग बघा एक दिवस तुम्हाला सुद्धा तुमच्या पाल्याचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जर हा लेख आवडला असेल, तर नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या मित्र परिवाराबरोबर, नातेवाईकांना बरोबर नक्की शेअर करा.

लेखक

मच्छिंद्र नवनाथ साळुंखे
एम ए क्लिनिकल सायकॉलॉजी
स्पेशल बी.एड. अध्ययन अक्षमता
व्हाट्सअप नंबर
96 73 73 42 61.

Tags: articledocterparentspsycologiststudents
ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर: तालुक्यातील शाळांना शिक्षण आयुक्तांची भेट, शाळेत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची घेतली माहिती
ताज्या बातम्या

भोर: तालुक्यातील शाळांना शिक्षण आयुक्तांची भेट, शाळेत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची घेतली माहिती

August 8, 2024
भोरः एसटी स्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य; स्थानकात अनेक सुविधांचा अभाव, नागरिक व विद्यार्थ्यांचे होताहेत हाल
ताज्या बातम्या

भोरः एसटी स्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य; स्थानकात अनेक सुविधांचा अभाव, नागरिक व विद्यार्थ्यांचे होताहेत हाल

August 7, 2024
बाप समजून घेताना….. विद्यार्थ्यींनीना अश्रू अनावर; वसंत हंकारेंची व्याख्यानमाला, मुले-मुली-पालकांचा उस्फुर्त सहभाग
ताज्या बातम्या

बाप समजून घेताना….. विद्यार्थ्यींनीना अश्रू अनावर; वसंत हंकारेंची व्याख्यानमाला, मुले-मुली-पालकांचा उस्फुर्त सहभाग

August 7, 2024
न्हावीच्या जिल्हा परिषद शाळेतील उपक्रम वैविध्यपूर्णः मा. जिल्हा परिषद सदस्या शलाका कोंडी यांनी दिली शाळेला भेट
ताज्या बातम्या

न्हावीच्या जिल्हा परिषद शाळेतील उपक्रम वैविध्यपूर्णः मा. जिल्हा परिषद सदस्या शलाका कोंडी यांनी दिली शाळेला भेट

August 6, 2024

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024
Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

October 21, 2024

Bhor Newsसावधान!!हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा ,पुन्हा एकदा शाळांना सुट्टी जाहीर.

0

पहिल्या वेतनाच्या रकमेतून बालचमुंना दाखविला “डंका हरिनामाचा” सिनेमा

0

Bhor News सावधान||भोर तालुक्यातील वरंधा घाट माथ्यावर अतिवृष्टी,या भागातील धानवली गावातील नागरिकांचे स्थलांतर

0

Bhor Breaking News पसुरेत वीजेच्या खांबावरून घसरून वायरमन जखमी

0
संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती

संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती

March 9, 2026
“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण…

“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण…

March 3, 2026
कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार

कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार

February 6, 2026
संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार

संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार

February 4, 2026

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2026 राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.) | Powered by राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2023 Rajgad news.live