इंदापूर: तालुक्यातील भवानीगर येथील मारुती काटे नावाचा तरुण गेल्या काही दिवसांपासून पोट दुखणाच्या आजाराने त्रस्त आहे. यामुळे पोट नेमकं कशामुळे दुखत आहे, याचे कारण जाणून घेण्यासाठी त्याने भवानीनगर येथील एका खाजगी लॅबमधून सोनोग्राफी केली. या सोनोग्राफित त्याला अपॅन्डिक्स झाल्याचा रिपोर्ट देण्यात आला. यासाठी तो तीन दिवस खाजगी हॅास्पिटलमध्ये भरती झाला. त्यानंतर खर्च परवड नसल्याने त्याने बारामती गाठली आणि तेथील मेडिकल कॅालेजमध्ये त्याची पुन्हा एकदा सोनोग्राफी करण्यात आली. या तपासाणीनंतर त्याला मूतखडा झाला असल्याचा रिपोर्ट देण्यात आला. या दोन वेगवेगळ्या रिपोर्टमुळे नक्की कोणता उपचार करायचा असा प्रश्न मारुती या तरुणाला पडला आहे.
मारुतीच्या बाबतीत जे घडलं आहे, त्याच्या मुळाशी जाणे अत्यंत गरजेचे आहे. याचे कारण संबधित रुग्णाला कोणता आजार किंवा त्रास असल्यास डॅाक्टर तपासणी करायला लावतात. यानंतर रुग्णाची तपासणी केली जाते. तपासणीनंतर त्याला नेमके काय झाले आहे, हे कळण्यासाठी रिपोर्ट दिला जातो. या रिपोर्टच्या माध्यमातून डॅाक्टार संबधित रुग्णावर ट्रिटमेंन्ट करतात. या प्रकरणात दोन वेगवेगळे रिपोर्ट आल्याने मारुती चांगलाच बुचक्यात पडला असून, कोणता इलाज करायाच असा प्रश्न त्याला सतावित आहे.