मतभेद विसरून झाली गावात एकमेकांची राम राम श्रीराम म्हणत गळाभेट
भोर तालुक्यात ग्रामीण भागातून गावा गावातून विजयादशमी दसरा हा सण मोठ्या उत्साहात धार्मिक पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या दिवशी खंडेनवमी असल्याने सर्वत्र देवीचा वाजत गाजत गोंधळ,आरती म्हणत बसविलेले घट उठविण्यात आले. हिंदूस्थान प्रतिष्ठान आयोजित गावा गावातुन निघणाऱ्या श्री दुर्गामाता दौडची महादुर्गामाता दौड मोठ्या शिवशाही थाटात भोर शहरातुन शिव तीर्थ चौपाटीपासुन प्रभातफेरी निघत सांगता झाली. यावेळी मोठ्या संख्येने लहान चिमुकल्यासह , तरुण ,तरुणी , प्रतिष्ठानचे शिवपाईक, धारकरी ,वारकरी उपस्थित होते.
शहरातील वॉशिंग सेंटरवर आणि भाटघर धरणावर बसरापूर येथे वेळवंडी नदीला किनारी दुचाकी, चार चाकरी वाहने स्वच्छ धुण्यासाठी मोठी गर्दी पहायला मिळाली. सर्वच गावांतील लोकांनी आप आपल्या घरी यंत्रे, उपकरणे, वाहने ,पारंपरिक शेतीच्या कामाची शस्त्रे, अवजारे, पुस्तके यांची पुजा केली, प्रत्येक गावा गावातून प्रथेप्रमाणे गावांच्या वेशीवर जाऊन ढोल ताशांच्या गजरात देवांची पालखी घेत ग्रामदेवतेची आरती ,पूजन करून सीमोल्लंघन करून आपट्याच्या पानांच्या रुपाने सोने लुटले . नंतर ग्रामदेवतेच्या समोर गावातील सर्वच ग्रामस्थ, तरूण, लहान थोरांनी मोठे रिंगण धरूण एकमेकांसोबत गळाभेट करुन राम -राम श्रीराम म्हणत आपट्यांच्या पानांचे सोने भेट दिले व घरोघरी वाटप केले. गावातील मयत झालेल्या व्यक्तींना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .यातुन गावात सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय ऐक्य जपण्याचा व एकात्मकतेचा संदेश दिला गेला. यावेळी प्रत्येक गावातून आपापले सरपंच,उपसरपंच,पोलीस पाटील, ग्रा.प.सदस्य, पो.मित्र ,ग्रामस्थ, तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दसरा हा केवळ एक सण नाही तर हा एक असा पौराणिक प्रसंग आहे . आपल्या सर्वांना वाईटावर चांगल्याच्या विजयाचा संदेश मिळतो. याच दिवशी श्रीरामाने दशानन लंकापती रावणाचा वध केला. माता दुर्गेने या दिवशी महिषासुराचा वध केला होता. हा दिवस विजयोत्सावाचा असल्याने म्हणूनच याला विजयादशमी म्हणतात अशी आख्यायिका आहे.