शिरवळ: शिरवळ मधील जिल्हा परिषद शाळे समोरील दुकानांना आज पहाटे भीषण आग लागली. या ठीकणी असलेले बेकरी व्यवसाय, सोनार दुकानदार, कपडे व्यवसायिक या सह आगीत ५ ते ६ दुकाने जळून खाक झाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरवळ ता.खंडाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समोर असलेले व्यवसायिक पत्र्याच्या गाळ्याना आज पहाटे अचानक आग लागली. आग एवढी तीव्र होती की यामध्ये शेजारीच असलेली बेकरी व्यवसाय, सोनार दुकानदार, कपडे व्यवसायिक या सह आगीत ५ ते ६ दुकाने जळून खाक झाली आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे दोन बंब आणि शिरवळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ आग विझवण्याचे काम सुरू केले.दुकानांमध्ये काय काय साहित्य होते याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. आगीचे कारण अस्पष्ट आहे. शिरवळ पोलिस आगीमागे काय कारण आहे याचा तपास करत आहेत.
सुदैवाने या आगीत कोणालाही दुखापत झाली नाही.
शिरवळ शहरात आगीच्या घटना वाढत आहेत. या आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने या आगीच्या घटनांवर त्वरित नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.