Saturday, October 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

धांगवडीतील शेतात रासायनिक टँकर फेकल्याने ओढ्यासह विहीर व नदी प्रदूषणाच्या धोक्यात

by SBPRNL
June 25, 2025
धांगवडीतील शेतात रासायनिक टँकर फेकल्याने ओढ्यासह विहीर व नदी प्रदूषणाच्या धोक्यात

You might also like

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

कापूरव्होळ : भोर तालुक्यातील धांगवडी गावात मंगळवारी (दि. २४ जून) रात्री घडलेल्या एका गंभीर घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण पसरलं आहे. अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तींनी गावाच्या हद्दीतील एका शेतात रासायनिक मिश्रण असलेला टँकर ओतल्याचं समोर आलं असून, त्यामुळे शेतीसह पाण्याचे स्रोत प्रदूषित होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

बुधवारी सकाळी ८ वाजता ग्रामस्थ सचिन विश्वनाथ तनपुरे यांनी गावचे सरपंच सचिन तुळशीराम तनपुरे यांना फोन करून शेतातून विचित्र वास येत असल्याची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यावर मातीवर लालसर थर, झाडांची सुकलेली पाने व मातीचे बदललेले स्वरूप आढळून आले. त्यावरून रासायनिक द्रव्य शेतात टाकल्याचा अंदाज पक्का झाला.

या घटनेमुळे संबंधित शेतातील पाणी पूर्णतः दूषित झालं असून, परिसरातील शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे हे पाणी ओढ्यातून पुढे वाहत जाऊन नदीत मिसळतं. या ओढ्यालगत गावाच्या पिण्याच्या पाण्याची विहीरदेखील आहे. त्यामुळे संपूर्ण गावात आरोग्यधोका निर्माण झाला आहे.

ग्रामस्थांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधला. उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून दूषित माती व पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. केमिकलचे स्वरूप स्पष्ट झाल्यानंतर स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

पर्यावरण तज्ज्ञांनी याला परिसंस्थेसाठी गंभीर धोका मानला आहे. जलसंपत्ती, जीवसृष्टी आणि मानवी आरोग्यावर याचे परिणाम होऊ शकतात. गावकऱ्यांनी दोषींना अटक करून कठोर शिक्षा द्यावी, तसेच विहीर आणि ओढ्याच्या तातडीच्या स्वच्छतेची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार
वेल्हे

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी
ताज्या बातम्या

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

Next Post

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

ताज्या बातम्या

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group