Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor – भोरला स्वर्गीय माजी नगराध्यक्ष अमृतलाल रावळ यांच्या ११ व्या  स्मृतिदिनानिमित्त आदर्श एकल माता कृतज्ञता सन्मान सोहळा

by कुंदन झांजले
June 26, 2025

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

स्व.माजी नगराध्यक्ष अमृतलाल रावळ यांच्या ११ व्या स्मृतिदिनी विविध उपक्रम

भोर  – नगरीचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष दिवंगत स्वर्गीय अमृतलाल रावळ यांच्या अकराव्या स्मृतिदिना निमित्त शर : प्रभा विकास प्रतिष्ठानच्या वतीने समाजातील आदर्श एकल मातांचा सन्मान बुधवार (दि.२५) करण्यात आला. माजी नगरसेविका लक्ष्मीबाई दळवी, सेवानिवृत्त शिक्षिका शैलजा लोहोकरे,  द्रौपदा नलावडे, अलका घोडके, शीला कंक, मीना भेलके, सुमन डवरी, संगीता दुधाणे, संगीता जाधव, सीमा घोणे आणि सुलाबाई पिलाणे यांचा आदर्श एकल माता म्हणून सन्मान करण्यात आला. भोर येथील श्रीमंत सौ.गंगुताई साहेब पंतसचिव वाचनालयाच्या सभागृहात कैलासबेन रावळ यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

प्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, महिला अध्यक्षा भारती शेवाळे, युवती जिल्हाध्यक्षा दुर्गा चोरगे, तालुकाध्यक्ष रवींद्र बांदल, माजी सभापती वंदना धुमाळ, प्रतिष्ठानचे सचिव विजय रावळ, माजी नगरसेविका राजश्री रावळ, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, तृप्ती किरवे, डॉ.सुरेश गोरेगावकर, डॉ.प्रदीप पाटील, ॲड जयश्री शिंदे व रावळ कुटुंबीय व सन्मानार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना डॉ.सुरेश गोरेगावकर यांनी स्व.रावळ यांच्या निष्ठेचा आदर्श समाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी घ्यावा असे सांगितले. जुन्या रूढी परंपरांना फाटा देत एकल मातांचा सन्मान करून रावळ कुटुंबियांनी समाजासमोर सकारात्मकतेचा एक आदर्श ठेवला असल्याचे मत भारती शेवाळे यांनी व्यक्त केले. दुर्गा चोरगे यांनी आदर्श एकल मातांच्या रूपाने समाजातील रणरागिणींच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान होत असल्याचे मत व्यक्त केले. सन्मानार्थी माजी नगरसेविका श्रीमती लक्ष्मीबाई दळवी यांनी आपल्या मनोगतातून स्व.रावळ यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाप्रसंगी भोर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रमोद गुजर यांनी स्व.रावळ यांच्या अकराव्या स्मृतिदिनी अकरा गरीब व गरजू विद्यार्थी त्यांच्या शिक्षणासाठी दत्तक घेत असल्याचे जाहीर केले.
याप्रसंगी कैलासबेन रावळ यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे विठ्ठल शिंदे यांनी प्रस्ताविक व स्वागत केले‌  पार्थ रावळ यांनी आभार मानले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष ढवळे यांनी केले.

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

Bhor- भोरमधील दुर्गम भागातील ६५ गरजू नागरिकांना पुणे येथे मोफत श्रवणयंत्र वाटप

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group